घरमहाराष्ट्रनिफाड तालुक्यात सर्वाधिक शस्त्र परवाने

निफाड तालुक्यात सर्वाधिक शस्त्र परवाने

Subscribe

निफाडमध्ये जिल्हा प्रशासनाने सर्वाधिक शस्त्र परवाने वितरित केले आहेत. स्वत:च्या तसेच मालमत्तांच्या रक्षणासाठी शहरात पोलीस आयुक्तांकडून तर ग्रामीण भागातील रहिवाशांना जिल्हा प्रशासनाकडून शस्त्र परवाने दिले जातात.

बागायतदारांचा तालुका अशी ख्याती असलेल्या निफाडमध्ये जिल्हा प्रशासनाने सर्वाधिक शस्त्र परवाने वितरित केले आहेत. स्वत:चे आणि मालमत्तांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांना पिस्तूल व तत्सम शस्त्र जवळ बाळगणे अत्यावश्यक वाटू लागले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ९२५ शस्त्र परवाने वितरित करण्यात आले असून, निफाड पाठोपाठ मालेगावात परवानाधारकांची संख्या अधिक आहे. अशा शस्त्र परवान्यांची नोंद राष्ट्रीय शस्त्र परवाना प्रणालीवर अनिवार्य असून त्यामुळे अधिकृत परवानाधारक शस्त्रधारकांची माहिती येत्या काळात एका क्लिकवर मिळू शकणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि ग्रामीण भागातही बेकायदेशीररित्या गावठी कट्टा, पिस्तूल यांसारखी शस्त्रे बाळगले जात असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. जमीनदारांसह अनेकांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावत असून, त्यामुळेच त्यांना स्व-संरक्षणासाठी शस्त्र जवळ बाळगणे अधिक हिताचे वाटू लागले आहे. स्वत:च्या तसेच मालमत्तांच्या रक्षणासाठी शहरात पोलीस आयुक्तांकडून तर ग्रामीण भागातील रहिवाशांना जिल्हा प्रशासनाकडून शस्त्र परवाने दिले जातात.

प्रत्येक परवाना धारकाला विशिष्ट ओळख क्रमांक

राष्ट्रीय शस्त्र परवाना प्रणालीवर ज्या परवानाधारकांची नोंद नसेल त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्याच्या सूचनाही सरकारकडून देण्यात आल्या आहेत. यामुळे शस्त्र परवानाधारक, शस्त्र दुरुस्ती, खरेदी-विक्री परवानाधारकांची माहिती भविष्यात एका क्लिकवर उपलब्ध होणे शक्य होणार आहे. या प्रणालीद्वारे माहिती अद्ययावत केल्यानंतर प्रत्येक परवाना धारकाला विशिष्ट ओळख क्रमांक (युनिक आयडिंटीफिकेशन कोड) दिला जातो. हा क्रमांक न घेतल्यास संबंधित शस्त्र परवानाधारकांचा शस्त्र परवाना रद्द होऊ शकतो असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे. ऑनलाईन अर्ज भरताना शस्त्र परवान्याची आवश्यकता का आहे, हे या अर्जामध्ये संबंधिताना प्राधान्याने नमूद करणे अनिवार्य आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात कुठे किती शस्त्रे

जिल्ह्यात सद्यस्थितीत ९१७ शस्त्र परवानाधारक असून, सर्वाधिक २७१ शस्त्र परवाने एकट्या निफाड तालुक्यात आहेत. त्याखालोखाल मालेगावात १३२ येवल्यात १९५ दिंडोरी ६०, इगतपुरी ५६, सिन्नर ४९, चांदवड ४३, कळवण ३९, सुरगाणा ३७, नांदगाव २८, बागलाण २७, देवळा २५, पेठ १४, त्र्यंबकेश्वर ११ जणांकडे परवाने आहेत. सर्वात कमी १०परवाने महापालिका क्षेत्र वगळता उर्वरीत नाशिक तालुक्यात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -