घरमहाराष्ट्रसंजय पाटील यांच्या पराभवाची ही ५ कारणं

संजय पाटील यांच्या पराभवाची ही ५ कारणं

Subscribe

यामुळे हरले संजय दिना पाटील

मुंबई उत्तर पूर्व या मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील हे भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांच्याविरोधात लढत होते. मात्र संजय दिना पाटील यांचा मनोज कोटक यांनी पराभव केला आहे. मनोज कोटक यांना ५ लाख १४ हजार ५९९ इतकी मते मिळाली असून संजय दिना पाटील यांना २ लाख ८८ हजार ११३ मते मिळाली आहेत.

  • संजय पाटील हे त्यांच्या नागरिकांना सहज भेटत असले तरी सकाळी लवकर त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना किंवा नागरिकांना त्यांची भेट होणे मुश्किल असल्याने अनेक नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे या नाराजीचा फटका त्यांना बसला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
  • भाजपचे उमेदवार मनोज कोटक हे आपल्या समोर फारच कमकुवत असल्याचा समज करत संजय पाटील यांनी कोटक यांच्या प्रचाराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी प्रचारावरही फार कमी भर दिला. नागरिकांपर्यंत पोहचण्याच ते कमी पडल्याने त्यांचा फटका त्यांना बसल्याचे बोलले जात आहे.
  • शिवसेनेने ही जागा प्रतिष्ठेची केल्याने त्याचा फटकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांना बसला. शिवसेनेने कोटक यांचा प्रचार करत मतदारसंघातील प्रत्येकापर्यंत कोटक यांना पोहचवण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये संजय पाटील कमी पडले.
  • संजय पाटील हे मनसे फॅक्टरवर अवलंबून होते. संजय पाटील यांच्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भांडुपमध्ये सभा घेतली होती. परंतु हा मनसे फॅक्टर निवडणुकीत चालला नसल्याने त्याचा फटका संजय पाटील यांना बसला.
  • गुजराती मतदारांनी एकगठ्ठा मतदान केल्याने त्याचा फटका संजय पाटील यांना बसला. गुजराती मतदार असलेल्या मुलुंड, घाटकोपर भागात मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आले याउलट संजय पाटील यांचा मतदार असलेल्या मानखुर्दशिवाजी नगर या परिसरात फारच कमी मतदान झाले त्याचाही फटका संजय पाटील यांना बसला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -