घरदेश-विदेशमुंबईत शनिवारी २२ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत शनिवारी २२ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात नवे २८ रुग्ण, आकडा १८२ वर

राज्यात कोरोनाचा विळखा वाढत असताना शनिवारी २८ नवे रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे यापैकी २२ रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळले आहेत. कोल्हापूर आणि पालघर मध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे, कोरोनाच्या रुग्णांची संख्या १८२ वर पोहोचली आहे. तर, सात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरीय परिसरातील आतापर्यंत १०८ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत.

दिवसेंदिवस मुंबईसह राज्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. यासाठी महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. महापालिकेच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ३५ खाटांचे विलगीकरण केंद्र आणि बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. ही सुविधा नागरिकांसाठी मोफत असणार आहे. पवईतही २५० खाटांचं विगलीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. नागरिकांना विविध किराणावस्तू आणि भाजीपाला इत्यादी सुविधांसाठी ऑनलाईन पद्धती वापरण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. लोकांनी जर ऑनलाईन पद्धतीने सर्व गोष्टी मागवल्या तर रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि संसर्ग होण्यापासून बचाव करता येईल.दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत.

- Advertisement -

ही संख्या कमी व्हावी यासाठी गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तरीही लोकांची गर्दी कमी होत नाही. शिवाय, आता भारत तिसर्‍या टप्प्यात असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे, केंद्र सरकारनेही राज्यांच्या मदतीने ज्या ठिकाणी करोनाचे अधिक रुग्ण आहेत त्या भागांमध्ये लक्ष केंद्रीय केले आहे. करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे. करोनाचा प्रादुर्भाव समाजात होऊ याची पूरेपूर काळजी घेतली जात आहे.

तर, शनिवारी देशात कोरोनाने दोन जणांचा बळी घेतला आहे. भारतात २०० हून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही ९३५ वर पोहोचली आहे. प्रत्येक राज्यांत कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल बनवण्यात येणार आहे. १७ राज्यांनी या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. यामुद्द्यावर सतत राज्यांच्या संपर्कात असून त्यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -