Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी इगतपुरी : आमदार खोसकर यांच्या चुलत्याची हत्या

इगतपुरी : आमदार खोसकर यांच्या चुलत्याची हत्या

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या वयोवृद्ध चुलत चुलत्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Related Story

- Advertisement -

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या वयोवृद्ध चुलत चुलत्याची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री सातपूर भागात घडली आहे. मात्र, या हत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत असून अज्ञात व्यक्तींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांचे चुलत चुलते प्रभाकर खोसकर (६५) यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली आहे. त्यानंतर मृतदेह सातपूर परिसरातील वासाळी रोडजवळ असलेल्या फाशीचा डांगर या परिसरात आणून टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राकेश हांडे यांच्यासह पोलीस आधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविला आहे. तर मृत प्रभाकर खोसकर हे व्यसनाच्या आहारी गेले होते, असे बोलले जात असून त्यांची हत्या नेमकी कोणी आणि का केली, याचा तपास लागलेला नाही. याबाबत सातपूर पाोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे करत आहे.


- Advertisement -

हेही वाचा – तो व्हिडिओ व्हायरल करु नका – सुप्रिया सुळे


- Advertisement -