घरमहाराष्ट्रनाशिकभद्रकालीतील तरुणाच्या खून प्रकरणातील ९ संशयितांना अटक, तिघे अल्पवयीन

भद्रकालीतील तरुणाच्या खून प्रकरणातील ९ संशयितांना अटक, तिघे अल्पवयीन

Subscribe

भद्रकालीच्या भीमवाडी झोपडपट्टी भागात मंगळवारी (दि.१५) रात्री झालेल्या अरबाज शेरू पठाण या तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली. त्यात तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भीमवाडी झोपडपट्टीतील मोकळ्या जागेत रात्री ८ वाजेदरम्यान खूनाची घटना घडली होती. कुणाल अनिल कोरडे याने त्याचाच मित्र असलेल्या कुणाल कापसे याच्या मैत्रीणीशी ठेवलेल्या प्रेमसंबधांमुळे कुरापत काढून मारहाण केली. कुणाल कोरडे व अरबाज शेरू पठाण हा जिवलग मित्र असल्याने, त्याने विशाल भगवती या मडक्या नावाच्या मित्राच्या गालात मारत त्याला हाकलून दिले. याच सुमारास पुढे अनिल कोरडे, अरबाज पठाण, विजय, उमेश व छोट्या हे तेथून जात असताना, मडक्या उर्फ कुणाल पगारे व विशाल भगवती यांनी बॉबी जगदाने, बटाट्या उर्फ गौरव उन्हवणे राहुल लहांगे, राजू लहांगे, कुणाल कापसे, विकी पाटील, चेतन इंगळे, अनिकेत टोपले, पंकज आहेर व इतर पाच-पाच जणांना बोलवून घेतले. या सर्वांनी मडक्याला मारल्याच्या रागातून कुणाल कोरडे व अरबाज पठाण यांना जबर मारहाण करत केली. तसेच, अरबाजवर हत्यारांनी वार करत त्याचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी कुणाल कापसे, अनिकेत टोपले, गौरव उन्हवणे, बॉबी बथुवेल जगदाने, विशाल भगवती, राहूल लहांगे यांच्यासह अन्य तीन अशा ९ जणांना ताब्यात घेतले. राजू लहांगे, विकी पाटील, चेतन इंगळे व पंकज आहेर हे फरार आहेत.

Nashik Edition start from 18 January
आपलं महानगरची नाशिक आवृत्ती १८ जानेवारी पासून सुरु
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -