दहशत माजवणाऱ्या गुंडांना अटक – ‘आपलं महानगर’ इम्पॅक्ट

नाशिक मधील लासलगावमध्ये भर चौकात तलवारी आणि कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.

Nashik
Crime
प्रातिनिधिक फोटो

लासलगावमध्ये भर चौकात तलवारी आणि कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या दोन संशयितांना आज लासलगाव पोलीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत आपला महानगरने २८ डिसेंबर शुक्रवार रोजी लासलगाव मध्ये गुंडांची दहशत या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करताच बातमीची दखल घेत लासगाव पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे. आकाश (आक्या) वाघ आणि राजु खैरे यांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी सागर वाघ याचा पोलीस शोध घेत आहेत.

नेमके काय घडले?

अवैध धंद्याच्या सूळसुळाटीनंतर लासलगाव मध्ये गँगवारने डोके वर काढले आहे. शिवाजी चौकात बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास काही गुंडांनी चौकात शिवीगाळ करत कोयते आणि तलवार काढत दहशत माजवन्याचा प्रकार घडला. यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या भीतीमुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडने मुश्किल झाल्याचे नागरिकांनी सांगितले. याबात ‘आपलं महानगर’ने याप्रकरणाची बातमी दिली होती. या बातमीचा इफेक्ट पडला असून याप्रकरणी तीन गुंडाना ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये नुसार लासलगाव मधील जोशीवाडा येथील गुंड आकाश वाघ आणि सोहन नगर येथे राहणाऱ्या राजु खैरे यांना लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केली असून सागर गणेश वाघ या तिसर्‍या आरोपीचा शोध सुरु आहे.


वाचा – लासलगावातील गँगवॉरमुळे स्थानिकांमध्ये भीती


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here