घरमहाराष्ट्रनाशिक२७ मार्चपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

२७ मार्चपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Subscribe

यंदाच्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या यजमानपदाचा मान नाशिकला मिळाला आहे. त्यादृष्टीने तयारीला वेग आला आहे. साहित्य संमेलन तारखा लवकर निश्चित केल्या जाणार असल्या तरी साहित्य संमेलन २७ ते २९ मार्च २०२१ या कालावधीत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे संपन्न होत आहे. साहित्य संमेलनात राज्याबरोबरच देश-विदेशातून साहित्यिक व मराठीवर प्रेम करणारे लोक येणार आहेत. त्यांच्या सरबराईत कुठेही कमतरता राहू नये, यासाठी लोकहितवादी मंडळ, सार्वजनिक वाचनालय नाशिकसह विविध संस्थांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. अनिल अवचट, ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, नाटककार मनोहर शहाणे यांची नावे चर्चेत आहेत. त्यासाठी विविध संस्था व संघटनांकडून पाठपुरावा केला जात आहे. साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी लवकरात लवकर तारीख निश्चित केली जावी. संमेलन कोणत्या तारखेला होणार आहे, याची उत्सुकता नाशिककरांना लागली आहे. नाशिकमध्ये २७ ते २९ मार्च २०२१ रोजी साहित्य संमेलन होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

अध्यक्षपदासाठी मनोहर शहाणेंचे नाव चर्चेत

साहित्य संमेलनासाठी प्रयोगशील कथाकार, कादंबरीकार, नाटककार मनोहर शहाणे यांच्या नावाचा प्रस्ताव, लोकहितवादी मंडळाने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांना दिला आहे. मराठी साहित्यात मनोहर शहाणे यांनी मोलाची भर घातली आहे. सत्यकथेसारख्या वाड्:मयीन नियतकालिकात त्यांचे लेखन प्रसिध्द आहे. त्यांचे ११ कादंबर्‍या, ४ कथा संग्रह प्रसिध्द झाले आहेत. शहाणे यांनी नाटक आणि एकांकिका लेखन केले आहे. त्यांच्या नाटकाचे प्रयोग राज्यनाट्य स्पर्धेत लोकहितवादी मंडळाने सादर केले होते. त्या प्रयोगास वेळोवेळी प्रथम, द्वितीय अशी पारितोषिके प्राप्त झाली आहेत. त्यांच्या साहित्यावर विद्यापीठ स्तरावर संशोधन झाले आहे.
तरी त्यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी मागणी लोकहितवादी मंडळाने केली आहे.

- Advertisement -

समित्यांमध्ये सहभागी व्हा

साहित्य संमेलनासाठी लोकहितवादी मंडळाकडून सल्लागार मंडळ (मार्गदर्शन समिती), पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, संयोजन व नियोजन समिती, स्वागत समिती, सत्कार समितीसह ३९ समित्या तयार करण्यात येणार आहेत. या समित्यांमध्ये नाशिककरांना सहभागी केले जाणार आहे. त्यासाठी नागरिकांना सुभाष पाटील, किरण समेळ, सुनील भुरे यांच्याशी संपर्क साधत नाव, मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी द्यावा, असे आवाहन लोकहितवादी मंडळातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -