घरमहाराष्ट्रनाशिककोथिंबीर जुडी @ १४२ रुपये

कोथिंबीर जुडी @ १४२ रुपये

Subscribe

बाजार समितीत सोमवारी सायंकाळी लिलावासाठी आलेल्या कोथिंबिरीची आवक

मागणी वाढल्याने आणि आवक घटल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावात कोथिंबिरीला सर्वाधिक 142 हजार रुपये शेकडा दर आज (दि.1) मिळाला आहे. पालेभाज्यात सर्वाधिक दराची टवटवी कोथिंबिरीला आलेली आहे.

बाजार समितीत कृष्णगाव येथील शेतकरी शिवाजी बस्ते यांच्या कोथिंबिरीला लिलावात 14 हजार 200 रुपये शेकडा दर मिळाला. त्यांनी 350 जुडी विक्रीला आणल्या होत्या.पालेभाज्या पिकवणार्‍या नाशिक, निफाड आणि दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने हजेरी लावल्याने कोथिंबिरीसह मेथी, पालक, शेपू आणि कांदापात ओली झालेली आहे. त्यामुळे त्यांची टिकवण क्षमता कमी झालेली आहे. ओली कोथिंबीर वाहतुकी दरम्यान खराब होत असल्याने व्यापार्‍याकडून पाण्यापासून बचाव झालेल्या कोरड्या कोथिंबीरला खरेदीत प्राधान्य दिले जाते. समितीत आज लिलावामध्ये कोथिंबिरीला प्रतवारी नुसार कमीत कमी 70 रुपये आणि सर्वाधिक 14 हजार 200 रुपये तर सरासरी 10 हजार रुपये शेकडा दर मिळाला.

- Advertisement -

कोरडा शेतमाल असेल तर त्याला योग्य व उच्चांकी बाजारभाव मिळत असल्याचे बाजारसमितीतील भाजीपाला व्यापार्‍यांनी सांगितले. बाजार समितीत सोमवारी सायंकाळी लिलावात सुमारे 35 हजार कोथिंबीर जुडी आल्याचे व्यापारी सांगत होते. मार्केट यार्डात गत महिन्यापासून पालेभाज्याची आवक कमी आहे. मात्र, महिन्यापूर्वी कोथिंबीर सर्वाधिक विक्रीला येत होती. त्यावेळी 5 ते 10 रुपये दराने कोथिंबीर जुडी विक्री झालेली होती.

चांगल्या प्रतवारीनुसार दर अधिक

बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कोथिंबीरीची आवक कमी आहे. अशा कोथिंबिरीला परपेठेत पाठवण्यासाठी व्यापार्‍यांकडून पसंती दिली जाते. ओली झालेली जुडी वाहतूकी दरम्यान कुजत असल्याने अशा कोथिंबिरीला कमी दर दिला जातो.जाड काडी, हिरवेगावरपणा आणि मोठी जुडी, यानुसार लिलावात कोथिंबीरीला सर्वाधिक दर दिला जात आहे.
– राजू आंधळे, व्यापारी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -