घरमहाराष्ट्रनाशिकमहानगरपालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयाचा कोपरा ढासळला

महानगरपालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयाचा कोपरा ढासळला

Subscribe

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयाच्या इमारतीच्या मागच्या बाजूला आज दिनांक २९ जुलै रोजी काही दगड कोसळल्याने मेनरोड परिसरात भीतीचे वातावरण झाले होते. पोलीस, महापालिका आपत्ती व्यवस्थापन तसेच अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत इमारतीची पाहणी केली आहे. या इमारतीला खालपासून थेट वरपर्यंत उभी मोठी भेग गेल्याने हा कोपरा कधीही ढासळू शकतो. याठिकाणी बघ्यांनी गर्दी केली आहे.

नाशिक महानगरपालिकेची जुनी इमारत म्हणून या इमारतीची ओळख आहे. या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मेनरोडवर हि इमारत उभी आहे. या इमारतीला आजूबाजूच्या दुकाने, हॉकर्स यांचा कायम वेढा असतो त्यामुळे हा परिसर नेहमीच गर्दीचा आहे. इमारतीचे बांधकाम ब्रिटिशकाली आहे. जीर्ण झालेल्या इमारतीकचे बांधकाम दगडामध्ये चुनखडी वापरून झालेले आहे. इमारतीच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने कधी लक्ष दिलेले नसल्याने त्यातील चुना निघून जाऊन दगड सैल झाल्याने हि भेग गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पक्षांच्या विष्ठेमधून येथे रोपे उगवून त्यांची वाढ झाल्याचे देखील येथे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -