Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी खुशखबर ! नाशिकमध्ये कोरोना लस दाखल

खुशखबर ! नाशिकमध्ये कोरोना लस दाखल

Related Story

- Advertisement -

शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयात आज सकाळी कोरोना लस दाखल झाली आहे. लसीचे वितरण दुपारी १२ वाजेनंतर जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आणि अन्य संस्थांकडे पुण्यात सर्वात मोठे कोल्ड स्टोरेज बनवण्यात आले आहे. त्यानंतर नियोजित केल्याप्रमाणे १६ केंद्रांवर लस १६ जानेवारीपूर्वी पाठवली जाणार आहे. एसओपीप्रमाणे सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यासाठी ४३ हजार ४४० लसी प्राप्त झाल्या आहेत. आरोग्य उपसंचालक आणि जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात लसींचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी दिली.

- Advertisement -