घरमहाराष्ट्रनाशिकसंभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या विरोधात निदर्शने

संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या विरोधात निदर्शने

Subscribe

संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा

केंद्रातील भाजप सरकार आणि मंत्री हे शेतकरी हित जोपासत नसल्याने हे उदासीन सरकार आहे. पीयूष गोयल वाणिज्य मंत्री यांनी कांदा निर्यातबंदीची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड, नाशिकच्या वतीने द्वारका येथे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या विरोधात निदर्शने करून व फोटो फाडून निषेध व्यक्त करण्यात आला.

मुंबईत ४०० कंटेनर कांदा सध्या निर्यातीसाठी बंदरांवर पोहचला आहे. याची कोण जबाबदारी घेणार, त्यानंतर बांग्लादेशासहित अनेक देशात भारताचा, प्रामुख्याने महाराष्ट्राचा कांदा घेऊन हजारो ट्रक उभे आहेत. शेतकऱ्यांनी ६/८ महिने सांभाळलेला कांदा मातीमोल भावाने विकायचा का, ज्यात उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. म्हणून केंद्र शासनाने नौटंकी न करता निर्यातबंदी मागे घ्यावी. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रभर व्यापक स्वरूपात आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

- Advertisement -

यावेळी उपस्थित जिल्हा सचिव नितीन रोठे-पाटील, शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ, विक्रम गायधनी, हर्षल पवार, लकी बावस्कर, आप्पा वाबळे, धोंडीराम सूर्यवंशी, शंतनू चराटे, सनी ठाकरे, शुभम भावसार, ललित निर्भवने, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -