Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आ. कांदेंच्या बंधुंकडून आ. खोसकरांच्या निकटवर्तीयांना धमकी

आ. कांदेंच्या बंधुंकडून आ. खोसकरांच्या निकटवर्तीयांना धमकी

सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुरुदेव कांदेंविरोधात तक्रार दाखल

Related Story

- Advertisement -

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघांचे आमदार हिरामण खोसकर यांचे निकटवर्तीय समीर साबळे यांना थेट आमदारांच्या कार्यालयात जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचे मोठे बंधू गुरुदेव कांदे यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुरुदेव कांदे हे पिंपळगाव बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती आहेत.

आमदार खोसकर यांचे ठक्कर बाजार (नवीन सीबीएस) येथे संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात आमदारांसह त्यांचे निकटवर्तीय समीर साबळे हे बसलेले असताना गुरुदेव कांदे यांचा मुलगा देवेंद्र कांदे हा खोसकरांच्या कार्यालयात आला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हरसूल येथील काम मला द्यावे, अशी मागणी साबळे यांच्याकडे केली. हे काम आधीच दुसर्‍या ठेकेदाराला दिले गेले आहे. त्यामुळे ते तुम्हाला मिळू शकणार नाही, असे साबळे यांनी सांगितले. एवढ्या वेळी थांबा, पुढच्या वेळी नक्की आपण काहीतरी करु, असाही सल्ला त्यांनी दिला. त्यानंतर कांदे यांनी आपल्या मोबाईलवरुन गुरुदेव कांदेंना फोन लावला. थोडावेळ बोलणे झाल्यानंतर तो फोन समीर साबळे यांच्याकडे दिला, यावेळी गुरुदेव कांदे यांनी आपल्याला फोनवरुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी करावा, अशी मागणी साबळे यांनी केली आहे.

कोण आहेत गुरुदेव कांदे?

- Advertisement -

गुरुदेव कांदे गुरुनाथ कांदे या नावानेही ओळखले जाते. पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे ते माजी उपसभापती राहिले असून विद्यमान संचालक आहेत. तसेच निफाड पंचायत समितीचे माजी उपसभापतीपदही भूषवले आहे. निफाड तालुक्यात त्यांचे चांगले राजकीय प्रस्त असले तरी त्यांचे धाकटे बंधू सुहास कांदे हे नांदगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही भावांमध्ये सध्या सख्य राहिले नसल्याचेही बोलले जाते.

- Advertisement -