मविप्रचे माजी उपसभापती विजय पवार यांचे निधन

विजय पवार यांची १९९२ ते १९९७ या कालावधीत उपसभापती म्हणून झाली होती निवड

MVP Vijay Pawar

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी उपसभापती विजय तुकाराम पवार यांचे बुधवारी (दि. ११) निधन झाले. नवी बेज (ता. कळवण) येथील ते मूळ रहिवाशी होते. गुरुवारी (दि.१२) सकाळी १० वाजता नवी बेज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

विजय पवार हे १९९२ ते १९९७ या कालावधीत डॉ. वसंतराव पवार यांच्या कार्यकारिणीत उपसभापती म्हणून निवडून आले होते. तरुण नेतृत्व व स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्वभावगुण होता. मविप्र समाजासह इतरही सामाजिक कार्यात ते हिरीरीने सहभागी होत. पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा नुकताच आयएएस झाला आहे.