घरमहाराष्ट्रनाशिकशहरात मुसळधार; आठवडाभरानंतर परतला पाऊस

शहरात मुसळधार; आठवडाभरानंतर परतला पाऊस

Subscribe

नाशिक शहरात रात्री उशिरा पावसाची जोरदार हजेरी; ग्रामीण भागातील काही तालुक्यांमध्येही परतला पाऊस

नाशिक शहरात रात्री उशिरा पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर उन्हाचा कडाका आणि उकाडा होता. संध्याकाळीही पावसाची काही चिन्हे नव्हती. मात्र, रात्री आठ वाजता शहरात सिडको, नाशिकरोड, गंगापूररोड आणि मध्यवर्ती भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यातही नऊ दिवसानंतर पाऊस झाला.

रात्री आठनंतर शहरातील काही भागात पावसाने तुरळक हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. मात्र, नाशिकरोड आणि सिडको परिसरात चांगला पाऊस झाला. गेल्या आठवड्यात पावसाने सलग चार दिवस हजेरी लावली होती. आज जिल्ह्यात सिन्नरमध्येही जोरदार पाऊस झाला. तसेच इगतपुरीत पाऊस झालेला होता. मात्र, शहरात दिवसभर पावसाचे काहीच चिन्हे नव्हती. पाऊस गायब झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.

- Advertisement -

ग्रामीण भागातही हजेरी

नाशिक शहरासोबतच ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली. निफाड व कळवण तालुक्यात सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र, या पावसामुळे पीकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला. काही भागांत मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -