घरमुंबई...आणि आयुक्तांनी सभागृह सोडले

…आणि आयुक्तांनी सभागृह सोडले

Subscribe

भाजप नगरसेवकाला आयुक्तांनी खडे बोल सुनावल्यानंतर नगरसेवकांनी सभागृहातच आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

ठाणे महापालिकेच्या प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नावरून पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि भाजप नगरसेवकांमध्ये आजच्या महासभेत जुंपली. भाजप नगरसेवकाला आयुक्तांनी खडे बोल सुनावल्यानंतर नगरसेवकांनी सभागृहातच आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सभागृहात गोंधळ सुरू झाल्याने आयुक्त जयस्वाल यांनी आपली अधिकाऱ्यांची टीम घेऊन सभागृहाबाहेर पडले.

प्रशाननाने दिलेल्या उत्तरावर आयुक्त असमाधानी

शुक्रवारी महासभा सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तरांच्या अनुषंगाने भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांचा कालावधी संपल्यानंतरही कोणाला वाढीव मुदत देण्यात आली? असा सवाल उपस्थित केला. यावर प्रशासनाच्या वतीने वर्षा दीक्षित यांनी उत्तर दिले. परंतु या उत्तरावर त्यांचे समाधान झाले नाही. उलट माझा प्रश्न तुम्हाला समजलाच नाही, असे पाटील यांनी सांगितले. अखेर आयुक्त जयस्वाल यांनी एकाच अधिकाऱ्याला वाढीव मुदत दिल्याचे सांगितले. त्यावर पाटील यांनी माझा प्रश्न व्यवस्थित वाचा, एकच अधिकारी आहे का? की आणखी काही अधिकारी आहेत? असा पुन्हा सवाल केला. त्यानंतरही आयुक्तांनी तेच उत्तर दिले. त्यावर तुम्ही दिलेले उत्तर चुकीचे असल्याचा दावा पाटील यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – श्रमजीवीच्या युवकांनी खड्ड्यांनी दिली मंत्र्यांची नावे

तुमचा हेतू ब्लॅकमेलींगचा – आयुक्त

तुमचा प्रश्न काय आहे? हे मला समजले. त्यामुळे तुम्ही असे का विचारत आहात त्यामागचा तुमचा हेतूही मला माहीत असल्याचे प्रतिउत्तर दिले. परंतु त्यानंतरही पाटील आपल्या प्रश्नावर ठाम राहिले. यावर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तुमचा हेतू ब्लॅकमेलींगचा वाटत असल्याचे सांगत अशा पद्धतीने ब्लॅकमेलींग करुन आपले लक्ष्य साधण्यापेक्षा नैतिक मार्गाचा अवलंब करुन लक्ष्य गाठावे असा सल्ला दिला. आयुक्त जयस्वाल यांच्या या सल्ल्यानंतर भाजप नगरसेवक आक्रमक झाले. आयुक्तांनी सभागृहाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली. आयुक्तांनी माफी मागितलीच पाहिजे यावर भाजप नगरसेवक अडून राहिल्याने अखेर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांसह सभागृह सोडले. तसेच महासभा सुरु झाल्यानंतर भाजपच्या नगरसेविका अर्चना मणोरा यांनीसुद्धा पुन्हा हिरानंदानी पार्कचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळीही आयुक्त आणि मणोरा यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -