घरमहाराष्ट्रनाशिकएक खडक काढल्यास होईल महिनाभर अतिरिक्त पाणीपुरवठा

एक खडक काढल्यास होईल महिनाभर अतिरिक्त पाणीपुरवठा

Subscribe

गंगापूर धरणात शुक्रवारपासून (ता. २१) चर खोदण्याचे काम सुरु झाले असले तरीही चारीतील एका खडकाने प्रशासनाला घाम फोडला आहे.

गंगापूर धरणात शुक्रवारपासून (ता. २१) चर खोदण्याचे काम सुरु झाले असले तरीही चारीतील एका खडकाने प्रशासनाला घाम फोडला आहे. २० वर्षांपासून या खडकाने चारीतील मोठी जागा व्यापली आहे. परिणामी खडक परिसरातील जागा उथळ होऊन तेथे अवघ्या २ मीटरपर्यंतच पाणी शिल्लक राहते. हा खडक खोदल्यास ५९८ मीटरच्या खालच्या पातळीचे पाणीही महापालिकेस वापरता येईल. म्हणजेच आजवर वापरता आले नाही असे तब्बल ५०० दशलक्ष घनफूट (महिनाभर) पाणी महापालिकेस उपलब्ध होऊ शकते. त्या अनुषंगाने महापौरांनीही हा खडक खोदण्याचे आदेशित केले आहे.

गंगापूर धरणात सध्या १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने ओढ दिल्यास पाणीपातळी अधिक खालावण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास धरणावरील महापालिकेच्या पंपिंग स्टेशनमधील जॅकवेलपर्यंत पाणी येऊ शकणार नाही. ते आणण्यासाठी धरणात चर खोदण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यापुर्वी २०१२ आणि त्यानंतर २०१६ मध्ये चर खोदरण्याची वेळ महापालिकेवर आली होती. मात्र याच परिसरात मध्येच मोठा खडक असल्याने महापालिकेच्या कष्टाळा फळ येताना दिसत नाही. धरणासाठी साठ्याचे काम करणार्‍या चारीत पाणी असूनही केवळ वीस वर्षांपासून निम्नपातळीवरील पाणी एका खडकामुळे जॅकवेलपर्यंत येऊ शकत नाही. या खडकामुळे संबंधित भाग उथळ होतो. त्यामुळे या भागात पाण्याची पातळी केवळ २ मीटरपर्यंतच असते. कमी पातळीमुळे पाणी जॅकवेलच्या पाईपलाईनपर्यंत येऊ शकत नाही. गेल्या वीस वर्षांपासून हा प्रश्न नाशिककरांसाठी त्रासदायक ठरत असून आजवर तो काढण्यासाठी प्रयत्न झालेले नाही. जलसंपदा विभागानेदेखील पालिकेला वेळोवेळी यासंदर्भात पत्र व्यवहार केला आहे. यंदा मात्र हा खडक तातडीने फोडण्याचे महापौरांनी आदेशित केले आहे. त्यासाठी अल्पमुदतीची निविदा काढण्याचे सूचित करण्यात आले आहे. हा खडक फोडल्यास चारीतील शेवटच्या थेंबापर्यंतचे पाणी महापालिकेस उपलब्ध होऊ शकते.

- Advertisement -

मुकणेची पातळी कमी; पण विनाअडथळा पाणी पुरवठा

मुकणे धरणातील पाण्याची पातळी आज केवळ ०.४ मीटर इतकीच आहे. तरीही या धरणातून पाण्याची उचल होत आहे. पाण्यात कोणताही अडथळा नसल्यावर अशा पध्दतीने शेवटपर्यंत पाणी वापरता येणे शक्य होते. या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणाजवळील चारीतील खडक तातडीने हटवणे गरजेचे आहे. आज या चारीतील पाण्याची पातळी खालवल्याने खडक काढणे सोयीचे झाले आहे. मात्र काही दिवसांत पाऊस आल्यास पातळी वाढून खडक काढणे जिकरीचे होणार आहे.

अडथळा कायमस्वरुपी धूर होईल

खडक फोडण्यासंदर्भात मी प्रशासनाला यापुर्वीच पत्र दिलेले आहे. पाणी पंपिंग होण्यास केवळ या खडकामुळे अडथळा येतो. हा खडक काढल्यास पाणीपुरवठ्यातील अडथळा कायमस्वरुपी कमी होऊ शकतो. – दिनकर पाटील, सभागृह नेता, महापालिका

- Advertisement -

नियोजन करणे आवश्यक

३१ जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास शहराला कशाच्या आधारे पाणीपुरवठा करणार याचेही नियोजन प्रशासनाने करणे आवश्यक आहे. चारीतील खडकामुळे पाणीपुरवठ्यास अडथळा येत आहे. त्यामुळे हा खडक तातडीने हटवणे गरजेचे आहे. – अजय बोरस्ते, विरोधीपक्ष नेता, महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -