घरमहाराष्ट्रनाशिकदुष्काळात १५ गुंठे ज्वारी पीक पशुपक्ष्यांसाठी

दुष्काळात १५ गुंठे ज्वारी पीक पशुपक्ष्यांसाठी

Subscribe

अस्वस्थ शिवार : सिन्नरच्या शिक्षकाची भूतदया; भूक शमवल्याने पक्षांचा चिवचिवाट

सिन्नर तालुक्यात सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसत असल्याने सगळीकडे पाण्यासाठी भटकंती करण्याचे दृश्य दिसत आहे. याचा फटका मनुष्याप्रमाणे वन्यजीव, पशुपक्ष्यांना बसत आहे. पशुपक्ष्यांना अन्न-पाणी नाही मिळाले तर त्यांचे मृत्यू होण्याची संभावना असते, असे प्रकार घडू नये म्हणून येथील खळवाडी परिसरातील व वाजे विद्यालयातील शिक्षक ज्ञानदेव नवले यांनी पशुपक्ष्यांवर भूतदया करत आपल्या शेतातील सुमारे १५ गुंठे ज्वारीचे पीक पशुपक्ष्यांसाठी खुले करून एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

ज्ञानदेव नवले यांनी शेतात १ बिगा ज्वारीचे पीक घेतले होते. यामध्ये त्यांनी १४ गुंठे जनावरांसाठी पीक काढले असता उरलेले ज्वारीचे पीक राहिले होते. अशातच ज्वारीच्या कणसांना टपोरी दाणे आले असून यावर चिमण्या साळुंखी, असे पाखरे येऊ लागल्याचे चित्र ज्ञानदेव नवले यांना दिसले. सर्वत्र पाणी टंचाई चाराटंचाई असताना पक्षांनी जायचे कुठे, असा विचार त्यांच्या मनात येताच त्यांनी शेतातील सुमारे १५ गुंठे ज्वारीचे पीक पशुपक्ष्यांसाठी खुले करून देण्याचे ठरवले. यामुळे त्यांच्या शेतात रोज अन्न-पाण्यासाठी हजारो पाखरे यायला लागली व अन्नाची भूक शमवल्याने ती बागडत चिवचिवाट करू लागली. पिण्यासाठी शेजारीच असलेल्या कुंडीतला पाण्याचा वापर केला. या स्तुत्य उपक्रमामुळे परिसरात एक नवा आदर्श त्यांनी उभा केला आहे.

- Advertisement -

पक्षांचा मुक्तविहार

परिसरात चिमण्या, साळुंखी, असे अनेक पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी व अन्य पाण्यासाठी दूरवर जाऊ नये म्हणून कुटुंबांनी ज्वारीचे सुमारे १५ गुंठे पीक पशुपक्ष्यांसाठी खुले करून त्यांची सोय केली आहे. चारा वाळल्यावर ते जनावरांसाठी काढून घेणार आहे. शेतातील विहिरी लगत पाण्याचे मोठे भांडे ठेवून व शेतात बांधला पाणी अडवून पक्ष्यांना अन्न व पाण्याची सोय केली आहे. यामुळे अनेक पक्षी शेतात ज्वारीचे टपोरी खाऊन शेजारी तृष्णा भागून मुक्त विहार करण्याचे चित्र पाहावयास मिळाल्याने आत्मिक समाधान लाभल्याचे नवले यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -