लोकसभा २०१९: ज्योतिष शास्त्रानुसार भाजपचे पारडे जड

डॉ. सचिन पाडेकर यांनी ‘आपलं महानगर’कडे मांडला ग्रहांचा अभ्यास

Nashik
Political_Kundali

आतापर्यंत शनिप्रधान व्यक्तीच श्रेष्ठपदी पोहोचल्या आणि यशस्वी झाल्या आहेत. त्यानुसार षष्ठेश शनी लग्नी आहे. तो विरोधकावर मात करण्याची जिद्द दर्शवतो. राहुल गांधी यांचा शनी मेषेत निचेचा आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार हे ग्रहांवरूनच सिद्ध होते.. हे भविष्य वर्तविले आहे नाशिकमधील प्रसिद्ध ज्योतिषी डॉ. सचिन पाडेकर यांनी मोदी आणि राहुल गांधी यांची कुंडली मांडून भविष्य वर्तवले आहे. त्यात यंदा भाजपचेच पारडे जड असल्याचे पाडेकर यांनी ‘आपलं महानगर’कडे मांडलेल्या कुंडलीत म्हटले आहे. लोकसभा निवडणूक निकालाबाबत अनेकांनी एक्झिट पोल दिले आहेत. ज्योतिषांनीदेखील आपले ‘एक्झिट पोल’ अर्थात भाकित जाहीर केले आहे.

Political_Kundali

 

 

डॉ. पाडेकर यांनी म्हटल्याप्रमाणे कुंडलीनुसार निकालाच्या दिवशी ग्रहांची स्थिती पुढीलप्रमाणे असेल, सकाळी ११.४४ पर्यंत धनू राशीत चंद्र आहे, नंतर मकरमध्ये प्रवेश. रवी बुध भ्रमण भाजपचे व्यात आहेत. तर, काँग्रेसच्या षष्ठात आहे. गुरू भ्रमण भाजपच्या षष्ठात आहे, तर काँग्रेसच्या व्यात आहेत. राहू भ्रमण भाजपच्या सप्तमांत आहे, तर काँग्रेसच्या लग्नात आहे. राहू भ्रमण भाजपच्या लग्नात आहे, तर काँग्रेसच्या सप्तमात आहे. मंगळ भ्रमण भाजपच्या लग्नात आहे, तर काँग्रेसच्या सप्तमांत आहे. दोन्ही पक्षांच्या कुंडलीचा २३ तारखेचा विचार करता भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असे दिसते.

वादाचा विषय तरीही चवीने वाचला जाणारा

प्रत्येक निवडणुकीत ज्योतिषांकडून वर्तवण्यात येणार्‍या भाकितांवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्षेप घेते. ज्योतिष हे शास्त्र नसून ती अंधश्रद्धा असल्याचे समितीने म्हटले आहे. तर ज्योतिष हे शास्त्रच असून त्याचे ठोकताळे पूरातन काळापासून मांडले जातात आणि त्यात तथ्यही आढळत असल्याचे ज्योतिषी सांगतात. ज्योतिष शास्त्र आहे की नाही हा वादाचा विषय असला तरीही लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ज्योतीषांने मांडलेले भाकित सर्वच मंडळी चवीने वाचताना दिसतात हेही तितकेच खरे.

भाजपकडे २८० जागा आणि ४० मित्रपक्ष

सर्व पत्रिका विचारात घेता केंद्रात भाजपला ५४३ पैकी २८० जागा प्राप्त होतील व ४० मित्रपक्ष मिळतील. उत्तर वायनाड सोडता सर्व ठिकाणी भाजप येईल. केंद्रात पुलोआ व भाजपला किती जागा मिळतील, याबाबत सांगितले की, भाजप २६० + इतर ६०, एकूण जागा ३२०. हेमा मालिनी, जया प्रदाही विजयी होतील. महाराष्ट्राचा विचार करता भाजप प्रथम, तर शिवसेना दुसर्‍या स्थानी असेल.महाराष्ट्र राज्याचा विचार करता महाराष्ट्र पत्रिकेत गुरू शनी कोदंड योग लग्नी आहे. निकालाचे दिवशी शनि केतू प्लुटो चंद्र लग्न आहे. त्यामुळे धार्मिक हिंदूप्रेम वाढून भाजप-शिवसेनेचे सर्वाधिक खासदार निवडून येतात.

 

महाराष्ट्र राज्याचा विचार करता महाराष्ट्र पत्रिकेत गुरू शनि कोदंड योग लग्नी आहे. निकालाचे दिवशी शनि केतू प्लुटो चंद्र लग्न आहे. त्यामुळे धार्मिक हिंदूप्रेम वाढून भाजप-शिवसेनेचे सर्वाधिक खासदार निवडून येतात.