नाशिक लोकसभा मतदारसंघ; समीर भुजबळ, पवन पवारांवर सर्वाधिक गुन्हे

नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार्‍या उमेदवारांपेैकी राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्यावर सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.

Nashik
Samir Bhujabal
समीर भुजबळ व पवन पवार यांच्यावर सर्वाधिक गुन्हे दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार्‍या उमेदवारांपेैकी राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्यावर सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांच्यावर एक गुन्हा दाखल असून खासदार हेमंत गोडसे यांच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी २९ एप्रिलला नाशिकमधून १८ तर दिंडोरीतून ८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नाशिकमधून शिवसेनेचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, अपक्ष अ‍ॅड. माणिकराव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्यात प्रमुख लढत होत आहे. राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव होतो, हे बहुतांश खरे आहे. मात्र, अनेकदा मतदारांना उमेदवारांवर खरंच किती गुन्हे दाखल आहे याची माहिती नसते. त्यामुळे यंदापासून उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती जाहीर करणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. तसे न करणार्‍या पक्षाची मान्यता काढून घेण्याचा किंवा स्थगित करण्याचा इशारा आयोगाने दिला आहे. उमेदवाराबाबत मतदारांना निर्णय घेता यावा या उद्देशातून तो आदेश देण्यात आला. उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती नमूद केली आहे. यात सर्वाधिक गुन्हे राष्ट्रवादीचे उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर दाखल असल्याचे दिसते. त्यांच्यावर मनीलाँडरींग, बेनामीसंपत्ती, मालमत्ता हस्तांतरण असे पंधरा गुन्हे दाखल आहेत. तर त्याखालोखाल वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्यावर दहा गुन्हे दाखल आहेत. यात पोलीस कर्मचार्‍याची हत्या, अवैध शस्त्रसाठा बाळगणे, खंडणी, तळेगांव दंगल प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. काही गुन्हे हे न्याप्रविष्ठ तर काही गुन्ह्यांमध्ये पोलीस तपास सुरू आहे. शिवसेेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. अपक्ष उमेदवार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे. दिंडोरीमध्ये माकपचे आमदार जीव पांडू गावित यांच्यावर सात गुन्हे तर राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांच्यावर एक गुन्हा दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

गोडसे, पवारांवर गुन्हा नाही

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, तर दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here