नेपाळमधील योगा चॅम्पियनशिपमध्ये नाशिकच्या योगपटूंचा बोलबाला

नेपाळ येथे शनिवारी (९ फेब्रुवारी) झालेल्या इंटरनॅशनल योगा चॅम्पियनशिपमधे नाशिकच्या योगापटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.

Nashik
YOGA
नेपाळमधील योग स्पर्धेत बाजी मारलेले स्पर्धक.

नेपाळ येथे शनिवारी (९ फेब्रुवारी) झालेल्या इंटरनॅशनल योगा चॅम्पियनशिपमधे नाशिकच्या योगापटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.

या स्पर्धेत ट्रॅडिशनल योगा प्रकारात नाशिकच्या गीत पटणी याने ६ ते १२ वयोगटातून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, सम्यक पटणी याने १३ ते २० वयोगटातून द्वितीय, तर काजल पटणी यांना ४० ते ५० वयोगटातून चौथा क्रमांक मिळाला. आर्टिस्टिक योगा प्रकारात गीत पटणी हिने तृतीय, तर वंदना रकिबा यांनी द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक पटकावत दमदार कामगिरी केली.