हे वाचा, तुम्हाला कुणीच फसवू शकणार नाही

सोशल साइट्स, व्हॉ्ट्स अॅपवरुन मेसेजेसद्वारे दिल्या जाणाऱ्या आमिषाला जराही बळी न पडता, सदसदविवेक बुद्धीचा वापर करत वास्तव जाणून घ्या. म्हणजे तुम्हाला कुणीही फसवू शकणार नाही. यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, हे बघा...

Nashik
credit-fraud
प्रातिनिधीक फोटो

तन्मय दीक्षित (सायबर फॉरेन्सिक सल्लागार)

इंटरनेटवरून अनोळखी नंबरद्वारे तुम्हाला व्हॉट्स अ‍ॅप अथवा टेक्स्ट मेसेज येऊ शकतात. पाठविणारी व्यक्‍ती जगाच्या पाठीवर कुठेही असू शकते आणि ती स्वतःची ओळख लपवून तुमची दिशाभूल करण्याचा, तुमच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करू शकते. कारण अशा व्यक्‍तींना याचे खास प्रशिक्षणच दिले जाते. एखादी कंपनी स्वतःच्या प्रमोशनसाठीदेखील आपल्या जुन्या ग्राहकांना, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना असे मेसेज पाठवल्यावर व्हर्च्युअल मनी दोघांनाही ऑफऱ करू शकते. अशा वेळी आमिषाला जराही बळी न पडता, सदसदविवेक बुद्धीचा वापर करत वास्तव जाणून घ्या. म्हणजे तुम्हाला कुणीही फसवू शकणार नाही. यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, हे बघा…

ही काळजी घ्या

 • तुम्हाला ज्या अ‍ॅप्लिकेशनवरून फसवा मेसेज आला आहे (उदा. व्हॉट्स अ‍ॅप किंवा फेसबुक, त्या अ‍ॅप्लिकेशनला तुम्ही ‘रिपोर्ट अब्युज’ असे करू शकतात. म्हणजे त्या कंपन्यांना संबंधित व्यक्‍तीचा उद्देश लक्षात येईल आणि ती कंपनी त्या व्यक्‍तीवर कायदेशीर कारवाई करेल.
 • असे नंबर वा ई-मेल्सना तुम्ही तुमच्या सेटिंगमधून ब्लॉक करून सुरक्षित राहू शकता व सायबर क्राइमचे बळी होण्यापासून स्वतःला वाचवू शकता.
 • फसवे मेसेज पाठविणार्‍या व्यक्‍तींवर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता. त्यासाठी भारतात सायबर लॉसुद्धा आहे.
  तुमचा वन टाइम पासवर्ड (ओटीपी), अकाउंटचा पासवर्ड, तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर अशी माहिती मिळवून फसवणूक केली जाते. त्यामुळे ही माहिती अत्यंत विश्वासातील व्यक्तीला आणि तुम्हाला त्याचा उद्देश माहित असल्याशिवाय कुणालाही देऊ नका.
 • अशा व्यक्‍ती तुमच्याशी संपर्कात असतील, तर त्यांच्याशी तुम्ही तुमच्या मातृभाषेत बोला. त्या व्यक्‍तीला तुमची भाषा येत नसल्यास ती तुमच्याशी संवाद साधू शकणार नाही.
 • तुमचा मोबाइल कधीही इतरांच्या हाती देऊ नका. कारण हॅकर एका मिनिटातही मोबाइल हॅक करू शकतो.
  मोबाइलमध्ये अँटी व्हायरस किंवा फायरवॉल सतत सुरू ठेवा. फाइल्स स्कॅन करा व रेग्युलर अपडेट ठेवा.
  प्ले-स्टोअरवरून अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करताना कोणकोणत्या परमिशन्स दिल्या आहेत, ते बघा. नको असलेल्या सर्व परमिशन्स काढून टाका. अनेकदा एका उद्देशासाठी डाऊनलोड केलेले अॅप्लिकेशन कॅमेरा, लोकेशन, एसएमएस, कॉल्स अशा अनेक परमिशन्स मागते.
 • जर एखादे अॅप्लिकेशन तुम्ही कधीतरी वापरत असाल तर ते जेव्हा लागेल तेव्हाच डाऊनलोड करा व काम झाले की डिलिट करा.
 • तुमच्या सर्व अकाउंट्सना सेकंड स्टेप ऑफ व्हेरिफिकेशन, टोकन सिक्युरिटी वापरा आणि अकाउंटला काही अडचण आल्यास बॅकअप बटण दाबून अकाउंट पुन्हा सुरू करा.
 • काम झाल्यावर कॉम्पुटर, मोबाईलचे वाय-फाय, ब्लू टूथ, एनएफसी बंद करा.
 • तुम्ही जेव्हा सार्वजनिक ठिकाणी असाल तेव्हा सोशल नेटवर्क साईट, ई-मेल, तसेच बँकेचे अकाऊंट कधीही ओपन करू नका. त्यातही ओपन वायफाय वापरत असाल तर अधिक सजग रहा.