घरमहाराष्ट्रनाशिकदुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार

दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार

Subscribe

महिरावानी शिवारात घडली घटना; त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

भरधाव दुचाकीचालकाने ७५ वर्षीय पादचारी वृद्धास धडक दिली. या अपघातात वृद्ध ठार झाला. दुचाकीवरील बापलेक जखमी झाले. ही घटना त्र्यंबकरोडवरील महिरावणी शिवारात घडली. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

चहादू शंकर आचारी (७५ रा.मुरंबी ता.इगतपुरी) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. दुचाकीचालक रामदास राघू देहाडे (३५) व प्रज्वल रामदास देहाडे (१०, रा. गायकवाड चौक, प्रबुद्धनगर, कार्बननाका) अशी जखमींची नावे आहेत.

- Advertisement -

देहाडे बापलेक रविवारी (ता.२१) रात्री दुचाकीने (एमएच १५ एफइ १११६) त्र्यंबकेश्वर येथून नाशिकच्या दिशेने जात होते. महिरावणी शिवारातील सोमा फार्म हाऊस परिसरात दुचाकीचालकाचा ताबा सुटला. भरधाव दुचाकीने त्र्यंबककडून राजूरच्या दिशेने पायी जाणार्‍या चहादू आचारी या वृद्धाला धडक दिली. अपघातात देहाडे बापलेक दूरवर फेकले गेले. नागरिकांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचाराआधीच पादचारी आचारी यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले. दुचाकीचालक रामदास देहाडे व प्रज्वल या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -