घरमहाराष्ट्रनाशिकशिवसेनेचा भगवा अन् धनुष्य गळ्यात पडतो तेव्हा..!

शिवसेनेचा भगवा अन् धनुष्य गळ्यात पडतो तेव्हा..!

Subscribe

कधीकाळी नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेची भिस्त खांद्यावर असलेल्या श्रमिक सेनेचे अध्यक्ष सुनील बागूल आणि वसंत गिते यांनी वेगवेगळ्या कारणांनी शिवसेना सोडली. मात्र, काही दिवसांपूर्वी युतीच्या महामेळाव्यात त्यांच्या गळ्यात शिवसेनेचा पटका दृष्टीस पडला.

कधीकाळी नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेची भिस्त खांद्यावर असलेल्या श्रमिक सेनेचे अध्यक्ष सुनील बागूल आणि वसंत गिते यांनी वेगवेगळ्या कारणांनी शिवसेना सोडली. मात्र, काही दिवसांपूर्वी युतीच्या महामेळाव्यात त्यांच्या गळ्यात शिवसेनेचा पटका दृष्टीस पडला.

कधीकाळी नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेची भिस्त ज्यांच्या खांद्यावर होती ते श्रमिक सेनेचे अध्यक्ष सुनील बागूल आणि वसंत गिते यांनी वेगवेगळ्या कारणांनी शिवसेना सोडली. त्यात बागूल यांची अंतर्गत वादातून २०१३ मध्ये पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली. पक्षातील जुना-नवा वाद त्यावेळी विकोपाला गेला होता. त्यात बागूल यांची भूमिका महत्वाची असल्याने त्यांचीही पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचीच मानसिकता केली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादीमय झाले. मात्र, तेथे त्यांना फारसा मान-सन्मान मिळाला नाही. त्यानंतर ते भारतीय जनता पार्टीत सहभागी झाले. वसंत गिते यांनी राज ठाकरे यांना साथ देत शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला खरा पण काही वर्षात तेथेही अंतर्गत वाद टोकाला गेल्यावर ते भाजपमय झाले. या पक्षात दोघा नेत्यांना प्रदेश उपाध्यक्षपद मिळाले. मात्र तरीही शिवसेनेसारखा थाट मात्र भाजपात नसल्याची खंत त्यांचेच कार्यकर्ते व्यक्त करतात. परिणामी ते या पक्षात अजूनही रममाण झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या अफवा वारंवार पसरतात. मनाने शिवसैनिक असलेले हे नेते काही कारणास्तव पुन्हा पूर्वीश्रमीच्या पक्षात जाऊ शकले नाहीत. मात्र काही दिवसांपूर्वी युतीच्या महामेळाव्यात त्यांच्या गळ्यात शिवसेनेचा पटका दृष्टीस पडला. काही तासांसाठी का होईना शिवसैनिकाचे सुख गळ्यात पडल्याने दोघेही प्रसन्न मुद्रेेने व्यासपीठावर विराजमान झाले नसतील तर नवलच !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -