दिंडोरी तालुक्यात अवैध मद्यसाठ्यावर छापा

करोनाचा संसर्ग पसरु नये म्हणून सर्वदूर संचारबंदी असताना दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव शिवारात सर्रासपणे अवैधपणे दारु विक्री सुरु होती. पोलिसांनी या अड्ड्यावर छापा टाकत चार हजार ६०० रुपये किंमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केला.

Nashik

करोनाचा संसर्ग पसरु नये म्हणून सर्वदूर संचारबंदी असताना दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव शिवारात सर्रासपणे अवैधपणे दारु विक्री सुरु होती. पोलिसांनी या अड्ड्यावर छापा टाकत चार हजार ६०० रुपये किंमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केला.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक-डाऊन असतांना पेठ व दिंडोरी तालुक्यातील अवैध व्यावसायिक खुलेआम बेकायदेशीररित्या मद्य विक्री करत असल्याचे पोलिसांना समजले. उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे व दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या कारवाईत देशी दारुच्या २ हजार ४९६ रुपये किंमतीच्या 48 सीलबंद दारूच्या बाटल्या तसेच एकूण २ हजार १४५ रुपये किंमतीच्या तेरा बिअरच्या बाटल्या असा एकूण 4 हजार 641 रुपयांचा अवैध माल संशयित आरोपी कैलास घोलप हा विक्री करीत होता. पोलिसांच्या छाप्याची त्याला चाहूल लागताच माल सोडून तेथून तो पळून गेला. पोलीस कर्मचारी हेमंत केदा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा. द. वी. दंड संहिता 65( ई ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हेगारांना लगाम घालण्यासाठी अरुण आव्हाड यांच्या पथकाने केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, शंकर जाधव, दिलीप पगार, आदी करत आहे.

हॉटेल बैठकच्या मागील बाजूस चोरट्यारितीने दारु विक्री होत असल्याची माहिती संबंधित अधिकार्‍यांना समजली. त्यानुसार आम्ही या अवैध अड्ड्यावर छापा टाकला. मात्र अंधाराचा फायदा घेत संशयित आरोपी कैलास घोलप हा शेजारी असलेल्या डाळींबाच्या बागेत पळून गेला. त्याविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केला आहे. यापुढेही अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
– अरुण आव्हाड, सहाय्यक उपनिरीक्षक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here