Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक एसटी चालक-वाहक भाऊबिजेला रजेवर?

एसटी चालक-वाहक भाऊबिजेला रजेवर?

एसटीकडून बोनस मिळत नसल्याने नाराजी, सोशल मीडियावर एसटीच्या कर्मचार्‍यांच्या नावाने व्हायरल मेसेजमुळे चर्चा

Related Story

- Advertisement -

दरवर्षी एसटीला सर्वाधिक उत्पन्नाचा स्त्रोत असलेला भाऊबीजेचा सण यंदा घाट्यात जाण्याची शक्यता आहे. कारण एसटीच्या चालक आणि वाहकांनी या दिवशी त्यांना असलेली सार्वजनिक सुटी सामुदायिकरित्या घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे एसटीकडून अत्यावश्यक म्हणून देण्यात येणार्‍या प्रवाशी सेवेत खंड पडून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

यंदा दिवाळी सणाला एसटीच्या प्रशासनाकडून कर्मचार्‍यांना अडीच ते पाच हजार रुपये बक्षीस दिले जाते. ही रकम कर्मचार्‍यांना द्यावी, हे काही वेतन करारात नमुद नाही. त्यामुळे एसटी प्रशासनावर रकम देण्यास बांधिलही नसते.गेल्या वर्षी राज्याच्या परिवहनमंत्र्यांनी अधिकारी, कर्मचार्‍यांना अडीच ते पाच हजार रुपये रकम दिवाळी बोनस म्हणून दिली होती. यंदाही ही रकम मिळाली असत, परंतू विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने बोनस देण्याचा कामगार प्रिय निर्णय जाहीर करणे एसटीला सोईस्कर वाटलेले नाही. त्यामुळे यंदा बोनस अभावीच एसटीच्या कर्मचार्‍यांची दिवाळी साजरी करावी लागणार आहे.दिवाळी आणि भाऊबीजेला एसटी महामंडळाच्या प्रत्येक डेपोवरील प्रत्येक गाडी प्रवाशाीं खचाखच भरल्या जातात. तसेच भारमानही वाढते. त्यामुळे जादा फेर्‍याही होतात. त्यामुळे एसटीच्या प्रशासनाकडून डेपोस्तरावर कार्यशाळा कामगार आणि चालक-वाहकांची हक्काची सुटी (पीएच) रद्द करण्यात येते. त्याचबरोबर कर्मचार्‍यांना अत्यावश्यक सेवेत म्हणून कामावर येण्यास भाग पाडले जाते. भाऊबीज ही वर्षात एसटी चालक आणि वाहकांना ज्या मोजक्या सुट्या असतात. त्यापैक एक असलेली सुटी असते. त्यामुळे एसटीने जर बोनस दिला नाही तर भाऊबीजेला हक्काची सुटी घेऊ, असा पवित्रा घेत चालक आणि वाहकांनी प्रशासनाकडे सामुदायिकरित्या अर्ज करण्याची तयारी चालविली आहे. यासाठी सोशल मीडियावरून एसटी कर्मचार्‍यांचे ग्रुपवरही माहिती व्हायरल केली जात आहे.

- Advertisement -

एसटीच्या कर्मचार्‍यांनी दोन-तीन वर्षापूर्वी ऐन दिवाळीत संप केल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले होेते. त्यावेळी शासनाने मध्यस्थी करीत कर्मचार्‍यांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतलेला होता. पण जेवढा दिवस संप झाला तेवढ्या दिवसात एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. तर एसटीच्या या संपाचा गैरफायदा घेत खासगी वाहतूकदारांनी अवाच्या सवा भाडेवाढ करीत प्रवाशांची आर्थिक लुट केली होती. यंदाच्या दिवाळीत जर असा पेच निर्माण झाला तर एसटीला कर्मचार्‍यांचा बोनस अतिशय नडणारा ठरेल.

व्हायरल मॅसेजमुळे चर्चेला ऊत

सध्या सोशल मीडियावर एसटीच्या कर्मचार्‍यांच्या नावाने व्हायरल झालेला आहे. त्यात म्हटले आहे की सर्व सरकारी, निमसरकारी, खासगी, कंत्राटी, कामगार, मजूर रखवालदार, कामठी यांना दिवाळी बोनस मिळतो. बोनस म्हणजे एक महिन्याचा पगार असतो. वर्षात 365 दिवस असतात. म्हणजेच 52 आठवडे असतात. एका महिन्यात 4 आठवडे असतात. म्हणजेच 52 अधिक 4 आठवडे म्हणजे 13 महिने होतात. कर्मचार्‍यांना 12 महिन्याचा पगार मिळतो. तर उरलेल्या एका महिन्याचा बोनस असतो. हा बोनस देण्याचा एक दिवस म्हणजे दिवाळी असते. एसटी कर्मचारी सोडून बाकी सर्वाना हा मिळतो.हा अन्याय असल्याचे मॅसेजमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

- Advertisement -