घरताज्या घडामोडीशहरात २ तरुणींसह युवकाची आत्महत्या

शहरात २ तरुणींसह युवकाची आत्महत्या

Subscribe

नाशिक शहरात दिवसेंदिवस एकटेपणा, प्रेमभंग, वाढत्या अपेक्षा, छळ व नैराश्यातून आबालवृद्धांमध्ये गळफास व विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये चितेंचे वातावरण आहे. शहरात बुधवारी (दि.२) एकाच दिवशी तीन जणांनी जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी देवळाली कॅम्प, अंबड व आडगाव पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. नानेगाव येथील जेरीना आनंद म्हत्रे (वय २५), धात्रक फाटा येथील सविता श्रीकृष्ण अभंग (वय ३३) व सिडको येथील हितेश दीपक जाधव (वय १८) यांनी आत्महत्या केल्या आहेत.

पहिल्या घटनेनुसार, हेल्पर म्हणून काम करणारा आनंद नारायण म्हत्रे हे पत्नी जेरीना व मुलासमवेत घरात झोपले होते. त्यावेळी जेरीनाने घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब पतीला समजताच त्याने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत तिला मृत घोषित केले. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक ढोन्नर करत आहेत.

- Advertisement -

दुसर्‍या घटनेनुसार, सागर व्हिलेज, धात्रक फाटा येथील सविता श्रीकृष्ण अभंग (वय ३३) हिने राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब कुटुंबियांना समजताचा उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत तिला मृत घोषित केले. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बस्ते करत आहेत.

तिसर्‍या घटनेनुसार, अक्षय चौक, पवन नगर, सिडको येथील हितेश दीपक जाधव (वय १८) याने राहत्या घरी नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शेख करत आहेत.

- Advertisement -

मानसिक ताण-तणाव, एकटेपणा, प्रेमभंग, नैराश्यामुळे शहरात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
एखादी घटना मनाविरुद्ध घडली की टोकाचा निर्णय घेतला जातो. नैराश्यग्रस्त व्यक्तीला कुटुंबियांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून वेळेत उपचार घ्यावेत. तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत संवाद ठेवावा.
– डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचारतज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -