तडीपार गुन्हेगार आला पोलिसांच्या जाळ्यात

प्रातिनिधिक छायाचित्र

पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेला असताना विनापरवानगी शहरात वावरताना सराईत गुन्हेगार आढळून आल्याची घटना रविवारी (दि.८) दीड वाजेदरम्यान नागसेन नगर येथे घडली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई युवराज गायकवाड यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी नागसेन नगर येथील मुस्तकीन ऊर्फ मुज्जा रहिम खान याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई युवराज गायकवाड पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार मुस्तकीन खान परवानगी न घेता व तडीपार आदेशाचे उल्लंघन करुन शहरात वावरताना दिसून आला. पुढील तपास पोलीस नाईक ए. डी. पवार करत आहेत.