नाशिकमध्येही हनी ट्रॅपचा धोका वाढला

एचएएल प्रकरणानंतर वाढतोय धोका, पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन

पाकिस्तानवरुन भारतीय नागरिकांना त्यांचे एजंट तयार करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. एजंट निर्मिती आधीपासून असली तरी ती आता मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. माहिती मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. नाशिकमध्येही पाकिस्तानकडून इन्फॉर्मर तयार केले जात आहेत. नाशिककरांनी हनी ट्रॅपपासून सावध रहावे. अनोळखी महिला संपर्क साधत असाल तर हनी ट्रॅप समजावा. +९१ भारताचा कोड असून याशिवाय दुसर्‍या कोडवरुन कॉल आल्यास प्रतिसाद देवू नये अन्यथा आपल्याकडून देशद्रोह झालेले समजून येणार नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस आयुक्त पाण्डेय म्हणाले, एचएएल कंपनीतील कर्मचारी दीपक शिरसाठचा पाकिस्तानाकडून त्यांच्या माहिती मिळवण्यासाठी शिरसाठचा वापर करण्यात आला आहे. गोपनीय माहितीसाठी पाकिस्तानकडून प्रयत्न चालू असून इन्फॉर्मर तयार केले जात आहेत. फसवणूक होणारी व्यक्ती एजंट कधी बनून जात ते समजून येत नाही.
पाकिस्ताकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला जात असून माहिती मिळवत आहेत. त्यामुळे सुरुवातीला अनोळखी कॉल किरकोळ वाटेल नंतर मात्र, देशद्रोह केल्याचे समजेल. तुम्हाला माहिती नसतानाही देशद्रोह केला जाईल. त्यामुळे नागरिकांसह सुरक्षा विभागात काम करणार्‍यांनी परदेशी अनोळखी व्यक्तीशी संपर्क ठेवू नयेत, असेही पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले.

अनोळखी परदेशी व्यक्तीशी संवाद करु नये. +91 हा भारताचा कोड असून परदेशी कोड असलेल्या कॉलवर बोलू नये. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अनोळखी ग्रुपमध्ये सहभागी करु नये. अनोळखी ग्रुपमध्ये सहभागी होवू नये. भारताच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या कार्यालयामध्ये नोकरी करणार्‍यांनी सोशल मीडियावर प्रोफाईल पदनाम व नोकरीबाबत उल्लेख करु नये. अनोळखी महिलांशी संपर्क साधत असाल तर हनी ट्रॅप समजावा. अनोळखी क्रमांक ब्लॉक करावेत, असेही आयुक्तांनी सांगितले.

अवैध धंद्यावर कारवाई

नाशिक शहरातील अवैध प्रवासी वाहतूक, बेकायदा मद्यविक्री, जुगार, रोलेटवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन कर्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र दिले आहे. त्यांच्यासह पोलिसांचीही कारवाई सुरु आहे. अवैध धंदे करणार्‍यांवर कारवाई करणारच आहे. इतर विभागांना मदत हवी असेल त्यांना पालिसांकडून मदत दिली जाणार आहे. कायदा, सुव्यवस्थेसह गुन्हेगारी आटोक्यात आणणे मुख्य काम आहे.