घरताज्या घडामोडीखेळताना गॅलरीतून पडून चिमुकल्याचा मृत्यू

खेळताना गॅलरीतून पडून चिमुकल्याचा मृत्यू

Subscribe

खेळताना इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील गॅलरीतून खाली पडल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.27) सकाळी 9.15 वाजता सम्राट सिम्फनी, नागरेमळा, इंदिरानगर येथे घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शौर्य राजेंद्र पाटील असे मृताचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शौर्य घरात खेळत असताना गॅलरीत आला. त्याला गॅलरीत जाताना घरातील कोणीच पाहिले नाही. खेळता खेळता तोल जावून तो सहाव्या मजल्यावरून खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही बाब कुटूंबियांना समजताच त्यांनी उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गोसावी करत आहेत.

- Advertisement -

मंदिरात विनावादन न ठेवल्याने पुजाऱ्यास मारहाण 

पाडवा ते रामनवमी अखंड विनावादन न ठेवल्याने एकाने पुजाऱ्यास मारहाण केल्याची घटना राम मंदिर, वाल्मिकनगर, पंचवटी येथे घडली.  याप्रकरणी बाबुराव गावंद यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी विजय बाबूराव माळी (51, रा.पंचवटी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीराम मंदिरात पाडवा ते रामनवमीपर्यंत अखंड विनावादन का ठेवले नाही, असे म्हणत विजय माळी याने गावंद यांना शिवीगाळ, मारहाण व दमदाटी केली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. व्ही. वाघ करत आहेत.

विठ्ठलवाडी परिसरात घरफोडी

घरमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने रोकड लंपास केल्याची घटना विठ्ठलवाडी, देवळाली कॅम्प येथे घडली. याप्रकरणी विष्णू खताळे यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विष्णू खताळे यांच्या गैरहजेरीत चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील 10 हजार रुपये, पासबुक लंपास केले. ते घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक हंडोरे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -