घरमहाराष्ट्रनाशिकपरतीच्या पावसाचा चौफेर धुमाकूळ; दिंडोरी तालुक्यात वृद्धा ठार

परतीच्या पावसाचा चौफेर धुमाकूळ; दिंडोरी तालुक्यात वृद्धा ठार

Subscribe

नवरात्रोत्सवाच्या जल्लोषावर फेरले पाणी, यात्रोत्सवावरही परिणाम, अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळले

दोन दिवसांच्या अंतराने आलेल्या परतीच्या पावसाने शहरासह ग्रामीण भागात दमदार बरसत चांगलाच तडाखा दिला. दिंडोरी तालुक्यात वीज पडून एक यमुनाबाई गांगुर्डे ही ६५ वर्षाची महिला ठार झाली. तर, ननाशी येथे सुनीता भोये (वय २९) ही महिला जखमी झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळले, तर बहुतांश सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. दिंडोरी, सिन्नर, निफाड आणि येवला तालुक्याला पावसाने झोडपले.

दिंडोरी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र, सायंकाळी पावसाने चार वाजेपासून दमदार बॅटिंग केल्याने वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडासह दमदार हजेरी लावल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.  परतीच्या पावसाने पिकांचेही मोठे नुकसान केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -