घरमहाराष्ट्रनाशिकतरुणाई अंमली पदार्थ्यांच्या विळख्यात

तरुणाई अंमली पदार्थ्यांच्या विळख्यात

Subscribe

न्यायवैद्यक प्रयोगशाळेत २२३ नमुन्यांची तपासणी; व्यसनांच्या आहारी जाणार्‍यांत पुरुषांचे प्रमाण मोठे

सुशांत किर्वे

उत्तर महाराष्ट्रातील २० ते ५० वयोगटातील तरुणाई अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडत आहे. गेल्या सहा वर्षात न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे २२३ नमुने तपासणीसाठी आल्याच्या आकडेवरून हे वास्तव समोर आले आहे. व्यसनांच्या आहारी जाणार्‍यांत पुरुषांचे प्रमाण मोठे आहे.

- Advertisement -

राज्यात पाच ठिकाणी न्यायवैद्यक प्रयोगशाळा आहेत. नाशिकच्या प्रयोगशाळेत जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांचा समावेश असून येथील प्रकरणे या प्रयोगशाळेत दाखल होतात. प्रयोगशाळेतील सामान्य विश्लेषण व उपकरण विभागात गांजा, भांग, चरस, हेरॉईन, कोकेन या अंमली पदार्थांचे नमुने तपासणीसाठी येतात. या प्रयोगशाळेत सर्वाधिक गांजाचे नमुने तपासणीसाठी आले असून या सर्व प्रकरणांची उकल प्रयोगशाळेने केली आहे. गत सहा वर्षात उत्तर महाराष्ट्रात २२३ ठिकाणी अंमली पदार्थांवर छापे टाकत कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या घटनेतील संशयितांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या तपोवन परिसरात १२ जून २०१८ ला ३४ लाखांचा ७०० किलो गांजा जप्त करण्यात आला. भाजीपाल्याच्या क्रेटमध्ये दडवून गांजाची वाहतूक सुरू होती. त्यावेळी नाशिक पोलिसांनी यतीश शिंदे आणि सुनील शिंदे यांना अटक केली. ओडिशातून आयशर गाडीतून १२०० किलो गांजा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत गांजा पकडला. सहा वर्षात नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर व नाशिकमध्ये वारंवार अशा घटना घडायला लागल्या आहेत. या घटना परत परत घडत असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

- Advertisement -

अवैध धंद्यांना आळा बसतोय

अंमली पदार्थविरोधी कारवाई पोलिसांकडून सातत्याने केली जात आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात अवैध धंद्यांना आळा बसत आहे. सर्वत्र आंतरराष्ट्रीय नशाविरोधी दिन २६ जूनला साजरा केला जातो. या दिवशी अंमली पदार्थांविरोधात जनजागृती केली जाते. – नरेंद्र गोसावी, सहायक संचालक, सामान्य विश्लेषण व उपकरण विभाग

तत्काळ उकल व अहवाल

सीआरपीसी-२९३ नुसार न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयात ग्राह्य धरला जातो. सामान्य विश्लेषण व उपकरण विभागात प्रकरणे दाखल झाल्यानंतर तात्काळ उकल करत अहवाल दिला जातो. – भाऊसाहेब मोरे, उपसंचालक, प्रादेशिक न्यायसहाय्यक वैद्यक प्रयोगशाळा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -