घरमहाराष्ट्रथोरल्या पवारांचा पार्थच्या उमेदवारीला नकार? अजित पवारांचं मात्र सूचक वक्तव्य!

थोरल्या पवारांचा पार्थच्या उमेदवारीला नकार? अजित पवारांचं मात्र सूचक वक्तव्य!

Subscribe

सध्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. मात्र पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हेच पार्थ यांच्या उमेदवारीवर अनुकूल नसल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. मात्र पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हेच पार्थ यांच्या उमेदवारीवर अनुकूल नसल्याची माहिती समोर येत आहे. घरातील सर्वांनीच निवडणूक लढवली तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? असे पवार यांनी या बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या या भूमिकेवर अजित पवार यांनी मात्र सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे. अगामी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रसची मुंबईत बैठक सुरू होती. त्यादरम्यान पार्थच्या उमेदवारीवर चर्चा झाली असून त्यावर आता संदिग्धता निर्माण झाली आहे.

अजून पुढच्या घडामोडी घडायच्या आहेत – अजित पवार

घरातील सर्वांनीच निवडणूक लढवली तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? असे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या बैठकीत सांगत पार्थ पवार यांच्या उमेदवारीला ब्रेक लागला. मात्र पार्थ यांचे वडील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ‘पवार साहेबांनी एकदा भूमिका घेतली तर आम्ही बोलत नाही’ असे सांगत त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. मात्र असे सांगतानाच ‘अजून पुढच्या घडामोडी घडायच्या आहेत, त्यामुळे मी आता बोलणे योग्य नसल्याचे’ त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्याला काय वाटतं, काय नाही ते मत मांडतात. पण मी अजूनपर्यंत तरी याबत विचार केलेला नाही. उद्या कोणी इच्छा व्यक्त केली म्हणून तिकीट मिळेल असे नसते. त्यासाठी संसदीय समिती असते. उमेदवाराला मतदारसंघात कोणी ओळखतो का? निवडून येण्याची क्षमता त्याच्यात आहे का? याची चाचपणी होते आणि त्यानंतर तिकीट द्यायचं की नाही हे ठरतं. तसेच पवारांनी एकदा एक भूमिका मांडली आम्ही त्यावर मत मांडणार नाही.

अजित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisement -

शरद पवार पुण्यातून लढणार नाहीत – जितेंद्र आव्हाड

दरम्यान, शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांनी स्वत: पुणे मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केल्याचे ट्विट केले आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी धरला होता, तसे सूतोवाचही राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केले होते. मात्र, त्या चर्चेवर आता पडदा पडला असून पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्येच पुण्यातून निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे आता शरद पवार नक्की कुठून निवडणूक लढवणार? किंबहुना पवार खरंच निवडणूक लढवणार की नाही? असे अनेक प्रश्न राजकीय पटलावर उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -