घरताज्या घडामोडी'बालिश बबिता, खुराक चालू असून देखील बालिश विधान' - रुपाली चाकणकर

‘बालिश बबिता, खुराक चालू असून देखील बालिश विधान’ – रुपाली चाकणकर

Subscribe

भारतीय महिला कुस्तीपटू बबिता फोगाट यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या एका ट्विटमुळे राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे. भारतीय खेळांडूना देण्यात येणारा ‘राजीव गांधी खेलरत्न’ हा पुरस्कार राजीव गांधी यांच्या नावाने नाही तर एखाद्या महान खेळाडूच्या नावाने देण्यात यावा, अशी मागणी बबिता फोगाट यांनी केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फोगाट यांच्यावर पलटवार केला आहे. “कुस्तीपटू असल्याने बदाम-खारकाचा शरीरासोबत बुद्धीला देखील चालना देणारा खुराक चालू असून देखील त्या या प्रकारची बालिश विधानं करत असतील तर मग अवघड आहे.” असे ट्विट चाकणकर यांनी केले आहे.

रुपाली चाकणकर यांनी तीन ट्विट करत बबिता फोगाट यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. “२०१९ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झालेल्या भाजप नेत्या बबिता फोगट म्हणतात की राजीव गांधी यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार नको. भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून त्या सातत्याने वादग्रस्त विधाने करतात. आमिर खानच्या दंगल चित्रपटामुळॆ प्रकाशझोतात आलेल्या बबिता यांनी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात मुस्लिम समाजाबद्दल देखील अशीच गरळ ओकली होती.”

- Advertisement -

“कुस्तीपटू असल्याने बदाम-खारकाचा शरीरासोबत बुद्धीला देखील चालना देणारा खुराक चालू असून देखील त्या या प्रकारची बालिश विधानं करत असतील तर मग अवघड आहे.”, अशी टिका चाकणकर यांनी केली आहे.

- Advertisement -

 

बबिता फोगाट यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट करत आपली भूमिका जाहीर केली होती. भारतीय खेळाडूंना देण्यात येणारा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ हा राजीव गांधींच्या नावाने नाही तर एखाद्या महान भारतीय खेळाडूच्या नावाने देण्यात यावा, अशी मागणी ट्विट करत त्यांनी केली.

भारतीय हॉकीत मेजर ध्यानचंद याचं योगदान लक्षात घेता २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वर्षभरात वेगवेगळ्या खेळात प्राविण्य मिळवलेल्या राष्ट्रीय खेळाडूंना ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ आणि ‘अर्जुन पुरस्कार’ दिला जातो. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दिवशी देकील बबिता फोगाट यांनी राजीव गांधी यांच्याविरोधातील ट्विट केले होते. “राजीव गांधी यांनी भारतात उभं राहून थेट इटलीमध्ये भाला फेकला होता आणि त्यामुळेच त्यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार दिला जातो का…” असे ट्विट त्यांनी केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -