घरCORONA UPDATEधक्कादायक! 'त्या' मेळाव्यातील १०६ जण पुणे विभागात; विभागीय आयुक्तांची माहिती

धक्कादायक! ‘त्या’ मेळाव्यातील १०६ जण पुणे विभागात; विभागीय आयुक्तांची माहिती

Subscribe

निजामुद्दीन येथे झालेल्या तलबीगी जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या तसेच त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्राप्त झाली असून त्यामध्ये १०६ जणांचा शोध लागला आहे.

निजामुद्दीन येथे झालेल्या तलबीगी जमातीच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या तसेच त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्राप्त झाली असून त्यामध्ये १०६ जणांचा शोध लागला आहे. तर बाकीच्या लोकांचा शोध सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली. डॉ. म्हैसेकर म्हणाले की, निजामुद्दीन येथे तलबीगी जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्रशासनास प्राप्त झाली असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १३६, सातारा जिल्ह्यातील ५, सांगली जिल्ह्यातील ३, सोलापूर जिल्ह्यातील १७ तर कोल्हापूर जिल्ह्यातील २१ जणांचा समावेश आहे. या माहितीची छानणी करताना त्यातील नावे दुबार आढळून आली आहेत. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यतिरिक्त आणखी ७ व्यक्ती आहेत.

हेही वाचा – Corona Impact: व्वा मुख्यमंत्री साहेब; ज्येष्ठ नागरिक-दिव्यांगांना घरपोच वस्तू मिळणार

- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील ७०, सातारा जिल्ह्यातील ५, कोल्हापूर जिल्ह्यातील १० आणि सांगली, सोलापूर या जिल्ह्यातील अशा १०६ जणांना ट्रेसिंग करून त्यातील ९४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याचे स्त्रावनमुने घेतले जातील. स्त्राव नमुना अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे डॉ. म्हैसकर त्यांनी सांगितले.

पुणे विभागातील १८२ जणांचा तपास सुरु

प्रशासनाला मिळालेल्या यादीतील ५१ व्यक्तीच्या कॉल रेकार्डनुसार ते बाहेरच्या राज्यात असण्याची प्राथमिक शक्यता आहे. तर उर्वरित तपास गतीने सुरु आहे. काही प्रकरणात काहींनी मोबाईलचे सिमकार्ड बदलले असल्याची माहिती पोलीस तपासात आढळून आली आहे. काही राज्यांच्या किंवा इतर जिल्ह्यात ज्यांचे संपर्क आढळून आले ती माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पुण्यातील ५१ जण इतर राज्यातील असल्याची माहिती मिळाली असून या संदर्भात खात्री केली जात आहे. पुणे विभागातील १८२ जणांचा तपास सुरु असून ते विभागात असतील तर त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल. तसेच त्यांचे स्त्राव नमुने घेतले जातील. स्त्राव नमुन्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहितीही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -