घरमहाराष्ट्रपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओला कॅबच्या प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओला कॅबच्या प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद

Subscribe

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तब्बल दहा ते बारा प्रवाशांना चाकूचा धाक धावत लुटले

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओला कॅब मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला तळेगाव पोलिसांनी जेरबंद केलं आहे. एप्रिल महिन्यात २० ते २६ तारखेच्या दरम्यान तब्बल दहा ते बारा प्रवाशांना मोटारीतून नेऊन मारहाण करत लुटल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी आरोपी पप्पू शिवाजी कांबळे, सनी गौतम घाडगे यांना निगडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार असल्याचे तळेगाव पोलिसांनी सांगितले आहे.

चाकूचा धाक दाखवत मारहाण

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फिर्यादी प्रताप खिमाजी भानुशाली आणि त्यांचा भाऊ हे मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबईला जाण्यासाठी हिंजवडी भुजबळ चौक येथे बसची वाट पाहात थांबले होते. तेवढ्यात ओला कॅब चालकाने प्रत्येकी ३०० रुपयात अंधेरी पर्यंत सोडतो अस म्हणाला. गाडीमध्ये पाठीमागील सीटवर दोघे जण अगोदरच बसलेले होते. फिर्यादी यांनी त्यांच्याकडील रोख रक्कम २० हजार रुपये असलेली बॅग डिक्कीत ठेवली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झाला. पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावरील लोढा स्कीमच्या पुढे जाताच फिर्यादी प्रताप आणि त्यांच्या भावाला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून गाडीच्या खाली ढकलून देण्यात आलं, आणि त्यांना तिथेच सोडून तेथील आरोपींनी पळ काढला.

- Advertisement -

पीडित प्रताप यांनी तळेगाव पोलिसात फिर्याद दिली. त्याप्रमाणे तळेगाव पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सीसी टीव्ही पाहण्यात आले, मोबाईल च्या तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या. गुप्त माहितीदारा मार्फत माहिती आरोपी हे निगडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली.

प्रवाशांनी सावधगिरी बाळगायला हवी

त्यानुसार त्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आला. अद्याप एक आरोपी फरार असून दोघे जण अटक आहेत. २० ते २६ एप्रिल रोजी पप्पू आणि सनीसह इतर एक आरोपीने डांगे चौक, वाकड ब्रिज, देहूरोड, सिम्बॉसिस कॉलेज, किवळे या परिसरातून तब्बल दहा ते बारा प्रवाश्यांना पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर प्रवास करत असताना चाकू चा धाक दाखवत लुटल्याची कबुली दिली आहे. यामुळे पुणे-मुंबई प्रवास करत असताना प्रवाशांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. सदरची कारवाई तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -