घरमहाराष्ट्रलासलगाव बाजार समितीत कांदा घसरला

लासलगाव बाजार समितीत कांदा घसरला

Subscribe

दक्षिण भारतातील नवीन कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे लासलगाव बाजार समितीत कांद्याचा दर घसरला असल्याचे दिसून येत आहे.

दक्षिण भारतातून दाखल होत असलेल्या कांद्यामुळे उन्हाळ कांद्याला फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात नगदी पीक असलेला उन्हाळ कांदा या सप्ताहात ७५३ रुपयाने घसरला असल्याचे दिसून येत आहे. दक्षिण भारतातील नवीन कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्यात २ हजार ५५० रुपयांपर्यंत असणाऱ्या कांदा भावात घसरण झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आजच्या कांदा भावात सुमारे ७५३ रुपयांची घसरण झाल्याचे चित्र दिसत आहे.

कांद्याची आवक मंदावली

लासलगाव बाजार समितीत आज कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १ हजार २६० रुपये असून जास्तीत जास्त भाव १ हजार ७९७ रुपये प्रति क्विंटल असे आहे. तर कांद्याची आवक सुमारे ७ हजार क्विंटल असून ही आवक मंदावली आहे. भाव वाढण्याच्या आशेने कांदा चाळीवर हजारो रुपये खर्चून शेतकऱ्यांनी सांभाळलेला कांदा विविध कारणांमुळे नाइलाजास्तव विकावा लागत आहे. बाजारात सध्या कांद्यांना अपेक्षित भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेले शेतकरी आणखीनच अडचणीत आले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने कांद्याला हमी भाव द्यावा, अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

दक्षिण भारतातील नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाल्याने बाजार समित्यांमधून उन्हाळ कांद्याला असलेली मागणी कमी झाली आहे. सध्या स्थितीला बंगलोर बाजार समिती मध्ये सुमारे ९०० ट्रक कांदा दाखल झाला असून तितक्याच प्रमाणात आजूबाजूच्या भागात लाल कांदा असल्याने आवक ही मोठ्या प्रमाणावर आहे. तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मागणी कमी झाली असल्याने कांद्याच्या भावात घसरण होत आहे.  – प्रवीण कदम, कांदा व्यापारी लासलगाव

वाचा – गोदामांमध्ये सडतोय हजारो टन कांदा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -