पोलिसांसाठी दंत चिकित्सेचे आयोजन

Mumbai
Dental treatment for police

सदैव कामात व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना आपल्या आरोग्य तपासणीसाठी वेळ काढणे सहज शक्य होत नाही, ही खंत जाणून घेत ग्लोबल इनिशेटिव्ह फाऊंडेशन आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त उपक्रमातून खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांसाठी येथे मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

खालापूरचे उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव बंडगर, खालापूरचे विश्वजीत काईंंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन केले गेले. खोपोली शहरातील दंत चिकित्सक, डॉक्टर, इंजिनीअर, वकील आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवकांच्या ‘गोल्डन इनिशिएटिव्ह फाऊंडेशनने’ सामाजिक कार्यात पदार्पण करताना शुभारंभ म्हणून या शिबिराचे नियोजन केले होते. डॉ सुवर्णदीप पाटील, डॉ. तेजस्वीनी पाटील, डॉ. आदित्य पाटील, डॉ. श्रुकिर्ती पाटील, डॉ. ऋतुराज पाटील, अ‍ॅड. प्रतीक मिश्रा, अक्षय सागणे, प्रवीण जाधव, पूजा साठेलकर, दुर्गेश पालांडे, सीमा त्रिपाठी, नीलेश पाटील, अमित चितळकर, गणेश शेळके, सुशांत म्हात्रे, दर्शन पापळ व इतरांनी यासाठी मेहनत घेतली.