घरताज्या घडामोडीमेड इन मुंबई लोको धावणार कांगडा व्हॅलीत...

मेड इन मुंबई लोको धावणार कांगडा व्हॅलीत…

Subscribe

परळ कार्यशाळेने उत्तर रेल्वेतील कांगडा व्हॅलीत चालविण्यासाठी, लॉकडाऊन दरम्यानचे पहिले झेडडीएम 3 लोको तयार केले आहे.

मध्य रेल्वेच्या परळ लोको कार्यशाळेने लॉकडाउन लागू झाल्यानंतर उत्तर रेल्वेसाठी पहिला नॅरो गेज इंजिन तयार करून दिला आहे. उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागातील कांगडा व्हॅली रेल्वे विभागात प्रवासी आणि माल गाड्यांच्या वाहतुकीसाठी या लोकोचा उपयोग केला जाणार आहे.  कांगडा व्हॅली हा पंजाबमधील पठाणकोट ते हिमाचल प्रदेशमधील जोगिंदर नगरपर्यंत जाणारा २ फूट ६ इंच (७६२ मिमी) गेजचा  रेल्वेमार्ग आहे.  हा मार्ग  १६४ किमी (१०१.९ मैल) लांब असून कांगडा व्हॅलीच्या उप-हिमालयन  प्रदेशातून जातो.

१२ लोको तयार करणार

 प्रचलित लॉकडाउन परिस्थितीमुळे मर्यादित स्त्रोत आणि सोशल डिस्टंसिंगच्या निकषांचे  पालन करून लोकोचे उत्पादन केले गेले.  हे मध्य रेल्वेवरील १२ इंजिनासाठीच्या ऑर्डर पैकी बनविलेले तिसरे इंजिन आहे.  कार्यशाळेने याआधीच नोव्हेंबर २०१९ आणि जानेवारी २०२० मध्ये असे दोन लोको तयार करून  पाठविण्यात आली आहेत. तत्पूर्वी  लॉकडाउन दरम्यान सानपाडा आणि माटुंगा वर्कशॉप्सने अनुक्रमे पहिला व दुसरा उपनगरी रेक पीओएच नंतर सेवेसाठी पाठविला आहे. तसेच परळ वर्कशॉपने प्रथम टॉवर वॅगन पीओएच नंतर सेवेत आणला आहे.

- Advertisement -

ही आहे या लोकोची  वैशिष्ट्य

कांगडा व्हॅलीच्या या लोकोमध्ये दोन्ही बाजूंनी चालविण्यासाठी समोरच्या ट्रॅकच्या उत्तम  दृश्यमानतेसह ड्युअल कॅब देण्यात आली आहे. उत्तर भारतात तीव्र थंडीच्या परिस्थितीत काम करण्यासाठी ही इंजिने कोल्ड स्टार्टने सुसज्ज आहेत. आवश्यकतेनुसार इंजिनला थंड करण्यासाठी लोकोमध्ये ‘ऑन डिमांड कूलिंग सिस्टम’ देखील देण्यात आले आहे. एअर ब्रेक्स ब्रॉडगेज लोको सारखेच आहेत. इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर डिझेल इंजिनच्या कार्यक्षमतेचे मापदंड प्रदर्शित केले जातात. ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, विजिलंस कंट्रोल डिव्हाइस आणि रेकॉर्डरसह इलेक्ट्रॉनिक स्पीडोमीटर यासारख्या सुरक्षा  वैशिष्ट्यांसह लोको उपलब्ध केले आहेत. भविष्यातील एअर ब्रेक ट्रेलिंग लोडची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हेवी ड्युटी कॉम्प्रेसर स्थापित केले आहेत.  दोन्ही ड्रायव्हर कॅबमध्ये हँड ब्रेक देण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेने लॉकडाऊन काळात मर्यादित स्त्रोत वापरून आणि सोशल डिस्टंसिंगच्या निकषांचे पूर्णपणे पालन करून लोकोचे निर्मिती केली आहे. परळ कार्यशाळेने उत्तर रेल्वेतील  कांगडा व्हॅलीत चालविण्यासाठी, लॉकडाऊनदरम्यान पहिले झेडडीएम ३ लोको तयार केले आहेत.  
शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -