घरमहाराष्ट्रचोरट्याचा पाठलाग पडला महागात, ट्रेनखाली येता येता वाचला

चोरट्याचा पाठलाग पडला महागात, ट्रेनखाली येता येता वाचला

Subscribe

लोकलमधून प्रवाशाचा मोबाईल हिसकावून चोरटा पसार, चोवीस तासांत पोलिसांनी आरोपीला केली अटक

विनायक उन्हाळे या प्रवाशाने शनिवारी सकाळी घाटकोपर स्थानकावरून कसार्‍याच्या दिशेने जाणारी लोकल पकडली. लोकल आंबिवली स्थानकात पोहचताच एका चोरट्याने उन्हाळे यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. उन्हाळे यांच्या लक्षात येताच त्यांनी चोरट्याचा पाठलाग केला. मात्र, चोरटा त्यांच्या हातून निसटला.

उन्हाळे यांनी पुन्हा लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. चालू लोकल ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेल्याने ते फलाटावर पडले सुदैवाने त्यांचा जीव बचावला. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या प्रकरणी कल्याण जीआरपीने चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांची ओळख पटवून गुन्ह्यातील आरोपी नामे मारुती खंडू सकट (20) याला अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हस्तगत केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल जावळे आणि इतर अधिकारी कर्मचार्‍यांनी केला. आरोपीला चोवीस तासांच्या आत अटक केल्याची माहिती कल्याण रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शार्दूल वाल्मिक यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -