अमोल कोल्हेला ताकद दाखवणार; शिरुरमध्ये बॅनरबाजी

ऐनवेळी शिवसेनेतून आलेल्या डॉ.अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने लांडे समर्थक नाराज झाले आहेत.

Mumbai
poster by ncp agains amol kolhe in shirur

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुपारी दुसरी यादी जाहीर केली असून, या यादीत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना शिरुरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अमोल कोल्हेंनी नुकतंच मनगटावरचं शिवबंधन सोडून राष्ट्रावादीमध्ये प्रवेश केला होता.  मात्र, आता त्यांच्या उमेदवारीवरून शिरूरमधील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. कोल्हेंना उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने भररस्त्यात बॅनर लावत, ‘आम्ही आमची ताकत दाखवणार’ असं थेट आव्हानच कार्यकर्त्यांनी दिलं आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी कोल्हे यांची डोकेदुखी ठरू शकते.

फेसबुकवर फलकाचा फोटो व्हायरल

दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीला विरोध करणारा हा फलक सध्या फेसबुकवर व्हायरल होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सागर डुंबरे या कार्यकर्त्यांने हा बॅनर लावला असून, या बॅनरमध्ये ”अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून लढणार आम्ही त्याला आमची ताकत दाखवणार” असे लिहीले
आहे. ‘लांडे साहेबानी अडचणीच्या काळात राष्ट्रवादी पक्षाला साथ दिली पण आता तुम्हाला योग्य जागा दाखवणार कोल्हेला पडणार’, असंही बॅनरवर छापण्यात आलं आहे. एकंदरच कोल्हे यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे पहायला मिळत आहे.

लांढे समर्थक नाराज

माजी आमदार विलास लांडे यांनाच शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. लांडे यांनी तशी तयारीदेखील केली होती.परंतु, ऐनवेळी शिवसेनेतून आलेल्या डॉ.अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने लांडे समर्थक नाराज झाले आहेत. भोसरीतील आळंदी रोड ला लांडे समर्थकाने फलक लावले असून त्यात डॉ.अमोल कोल्हे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यामन, या पोस्टरबाजीमुळे या निवडणुकीत डॉ.अमोल कोल्हे यांना अंतर्गत फटका बसू शकतो. त्यामुळे आता पक्ष श्रेष्टी यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here