पुणेकरांकडून यंदा कमी आवाजाच्या फटाक्यांना पसंती

दिवाळी साजरी करणार्‍या पुणेकरांकडून यंदा मात्र कमी आवाजाचे फटाके वाजवण्याकडे कल असल्याचे दिसत आहेत.

Pune,Maharashtra
Diwali Crackers
फटाके

दिवाळी साजरी करणार्‍या पुणेकरांकडून यंदा मात्र कमी आवाजाचे फटाके वाजवण्याकडे कल असल्याचे दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडविण्याच्या निश्चित केलेल्या वेळा, एकूणच बाजारातील मंदी आणि शाळांमध्ये फटाकेमुक्त दिवाळीबाबत केले जाणारे प्रबोधन अशा कारणांमुळे यंदा पुण्यात फटाक्यांच्या दणदणाटात लक्षणीय घट झाली आहे.

ऐन दिवाळीत पावसाची हजेरी 

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी अनेकांनी फटाके न वाजविण्यासाठी शपथ घेतली आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार फक्त दोनच तास फटाके वाजविण्याची परवानगी मिळाली होती. याचा परिणाम म्हणून गतवर्षीच्या तुलनेत यंदा शहरात फटाक्यांच्या विक्रीत ४० ते ५० टक्के घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पुण्यात ऐन दिवाळीत पावसाने हजेरी लावली आहे. गेली तीन दिवस पाऊस सुरू आहे. दोन वर्षांपासून बाजारात मंदीसदृश वातावरण आहे. त्याबरोबरच फटाके विक्रीवरही बंधने आल्याने फटाके विक्रीचे स्टॉल यंदा कमी आहेत. मोठ्या आवाजाचे आणि वायू प्रदूषण करणारे फटाके वाजवणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही तसे आदेश दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here