घरदेश-विदेशSabarimala : प्रवेशापासून महिलेला रोखलं, एकाला अटक

Sabarimala : प्रवेशापासून महिलेला रोखलं, एकाला अटक

Subscribe

शबरीमाला मंदिरामध्ये भाविक महिलेला प्रवेशापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या २९ वर्षीय भाविकाला अटक करण्यात आली आहे. तर २२० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्शनासाठी उभी असलेली महिला ही ५२ वर्षाची असल्याची माहिती आता तपासातून समोर आली आहे.

शबरीमालामध्ये महिलांच्या मंदिर प्रवेशाचा वाद आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यावेळी देखील महिलेला मंदिर प्रवेश करण्यापासून रोखण्यात आलं. त्याप्रकरणामध्ये एकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दर्शनासाठी शबरीमाला मंदिर खुलं करण्यात आलं. यावेळी ५२ वर्षीय ललिता रावी या शबरीमाला मंदिरामध्ये आल्या होत्या. यावेळी सदर महिला ५० वर्षाखालील असल्याची शंका भाविकांना आली आणि तिला मंदिर प्रवेशापासून रोखण्यासाठी अनेक जण सरसावले. त्यानंतर समोर आलेले फोटो आणि डीजीटल पुराव्यावरून २९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी २२० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आधार कार्ड पाहिल्यानंतर ललिता रावी या ५२ वर्षाच्या असल्याचं स्पष्ट झालं.

वाचा – आरएसएसच्या नेत्याने मोडली शबरीमाला मंदिराची परंपरा

महिलांना प्रवेश देण्यावरून वाद

शबरीमालामध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात यावा असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. पण भक्तांनी मात्र आम्ही आमची परंपरा सोडणार नाही असा पवित्रा घेतला. त्यावरून मोर्चे देखील निघाले. शिवाय, आंदोलनं देखील करण्यात आली. प्रवेश करणाऱ्या १० ते ५० वयोगटातील महिलांना रोखण्यात आले. यावेळी हिंसाचार होऊन काही पत्रकार, पोलिस आणि भाविक देखील गंभीर जखमी झाले. कोर्टाच्या निर्णयानंतर देखील भाविकांनी आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. यापूर्वी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी ४५०हून जास्त लोकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तर काही भाविकांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध देखील सुरू आहे. पण, भाविकांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवत कोणत्याही परिस्थितीमध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांना शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. परिणामी, अद्याप देखील मंदिर परिसरात १५०० जास्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

वाचा – शबरीमाला मंदिर महिला प्रवेश; ४५० गुन्हे तर २०६१ जणांना अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -