घरमहाराष्ट्रशांत रहा !,राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

शांत रहा !,राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

Subscribe

तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न होईल, पण शांत रहा! लोकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नका. तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी ईडी कार्यालयाबाहेर येऊ नये, अशी सक्त ताकीद राज ठाकरे यांनी मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 22 ऑगस्ट रोजी ईडीच्या चौकशीसाठी बोलावल्यामुळे मुंबई आणि ठाण्यासह अनेक ठिकाणी मनसैनिकांनी बंदचा इशारा दिला होता. मात्र राज ठाकरे यांनी स्वत: हस्तक्षेप करत शांत राहण्याचे आवाहन मनसेच्या कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना केले आह

राज ठाकरे म्हणतात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्या, माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वांनी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटिसींचा आदर केला आहे. त्यामुळे आपण या अंमलबजावणी संचलनालयाच्या(ईडी) नोटिसीचा देखील आदर करू. इतक्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे; म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की येत्या 22 ऑगस्टला शांतता राखा.

- Advertisement -

सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचायचा प्रयत्न होणार; पण तरीही तुम्ही शांत राहा, असे आवाहनच राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केले आहे. तसेच माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो माझ्यावर तुमच्या सर्वांच्या असलेल्या प्रेमाची मला जाणीव आहे; पण तरीही विनंती की कुठल्याही पदाधिकार्‍याने अथवा महाराष्ट्र सैनिकांनी ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नये. ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, सामान्य जनता आणि व्यापारी वर्गाला त्रास होता कामा नये, यासाठी राज ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याचेही मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.

राज ठाकरेंबरोबर कोण जाणार हे त्यादिवशीच ठरवू, कार्यकर्त्यांच्या बैठकीतील निर्णय राज ठाकरेंना कळवण्यात आला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी सरकारचा निर्णय आहे. त्याचे आपण स्वागत केले पाहिजे. तुम्हाला डिवचायचा प्रयत्न झाला तरी सावधान राहा, असे आवाहनही राज ठाकरेंनी केल्याचे बाळा नांदगावकरांनी सांगितले. राज ठाकरेंनी आवाहन केल्यामुळे मनसैनिक आणि पदाधिकारी शांतता पाळण्यासाठी प्रयत्न करतील, अशी आम्हाला आशा आहे, असेही मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

- Advertisement -

उन्मेष जोशी, राजन शिरोडकर यांची एकत्रित चौकशी
दादर येथील कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सोमवारी याप्रकरणी सुमारे आठ तास उन्मेष जोशी यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी उन्मेष जोशी यांच्यासह राज ठाकरे यांचे निकटवर्तीय, बांधकाम व्यावसायिक आणि भागीदार राजन शिरोडकर यांची ईडी कार्यालयात एकत्र चौकशी करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -