घरमहाराष्ट्रपहिला प्रो-गोविंदा सहा महिन्यात जिल्हास्तरीय फेडरेशनची उभारणी होणार

पहिला प्रो-गोविंदा सहा महिन्यात जिल्हास्तरीय फेडरेशनची उभारणी होणार

Subscribe

दहिहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा मिळावा यासाठी येत्या दिवसांमध्ये प्रयत्न करण्यात येणार आहेत. आगामी सहा महिन्यांत प्रो-गोविंदासाठी मोठी स्पर्धा भरवण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठीच जिल्हावार फेडरेशनकडून प्रतिनिधीत्व समोर येणे गरजेचे आहे. दहिहंडीची स्पर्धा वर्षभर आयोजित करता येईल, यासाठीचे प्रयत्न करण्याचा दहिहंडी समन्वय समितीचा मानस आहे. त्यासाठी प्रो गोविंदाच्या माध्यमातून दहिहंडी मंडळांमध्ये जिल्हावार स्पर्धा भरवणे हे उद्दिष्ट समन्वय समितीच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्य सरकारची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.

आतापर्यंत ज्या जिल्ह्यांमध्ये दहिहंडी हा साहसी खेळाचा प्रकार खेळला जातो, तेथे फेडरेशनच्या माध्यमातून प्रतिनिधित्व उभे करणे हा आमचा महत्वाचा उद्देश आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, कोकण, कोल्हापूर, पुणे यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहिहंडीचा उत्सव होतो. म्हणूनच या जिल्ह्यातील प्रतिनिधीत्व हे फेडरेशनच्या माध्यमातून येणे महत्वाचे आहे. साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा मिळाल्यानंतर आता फेडरेशनची भूमिका महत्वाची आहे, असे मत दहिहंडी समन्वय समितीचे सचिव सुरेंद्र पांचाळ यांनी मांडले.

- Advertisement -

वर्षभर दहिहंडीचा क्रीडा प्रकार राबवायचा असेल तर कोणत्या नियमांचा समावेश करायचा, तसेच जिल्हास्तरीय नियमावली काय असेल यासाठी फेडरेशनची भूमिका महत्वाची असणार आहे. पुढच्या सहा महिन्यांत फेडरेशनचे प्रतिनिधीत्व उभे होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पांचाळ यांनी स्पष्ट केले. सध्या महाराष्ट्रात एकूण ७०० दहिहंडी मंडळे आहेत. त्यापैकी बहुतांश मंडळे ही समन्वय समितीकडे नोंदणी असलेली मंडळे आहेत.

साहसी क्रीडा प्रकार म्हणून दहिहंडी उत्सव वर्षभर साजरा व्हावा, यासाठी राज्य सरकारची भूमिकाही महत्वाची आहे. राज्य सरकारकडून यासाठी आर्थिक मदत मिळतानाच, यासाठी विशेष बजेटही मंजुर व्हायला हवे, असे पांचाळ यांनी सांगितले. मोठी क्रीडा संकुले तसेच स्टेडिअम, मैदान उपलब्ध होण्यासाठी समन्वय आणि राज्य सरकार यांची भूमिका महत्वाची असेल असेही ते म्हणाले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -