घरCORONA UPDATEआधी दारूच्या दुकानातील नोंदणी, तर आता शिक्षकांवर सोपवलं 'डिलिव्हरी बॉय'चे काम!

आधी दारूच्या दुकानातील नोंदणी, तर आता शिक्षकांवर सोपवलं ‘डिलिव्हरी बॉय’चे काम!

Subscribe

बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यात हा प्रकार घडला

आपल्याकडे कोणतेही संकट आले की किंवा एखादे सरकारी काम करायचे असले की शिक्षकांना वेठीस धरले जाते. या कोरोनाच्या काळात अनेक शिक्षक आजही घराघरात जाऊन कोरोनाची चाचणी घेतात. बीडमधील शिक्षकांनी रेशन दुकानावरील नोंदीचे काम केल्यानंतर, दारूच्या दुकानासमोरील माहिती गोळा करण्याचे काम शिक्षकांना देण्यात आले. मात्र आता या शिक्षकांवर किराणामालाची होम डिलिव्हरी देण्याचे काम दिले आहे.

बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यात हा प्रकार घडला. तालुक्यातील ५१ शिक्षकांना डिलिव्हरी बॉयची कामं देण्यात आली आहेत. जिल्ह्यातील पाटोदाच्या तहसीलदारांनी शिक्षकांना नगरपंचायतीच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना किराणा माल तसेच जीवनावश्यक वस्तू घरपोच पोहोचण्याचे काम दिले आहे. मात्र शिक्षकांना असे काम देणं योग्य नाही हा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघटनेने केली आहे.

- Advertisement -

शिक्षकांना दिले डिलिव्हरी बॉयचे काम

लॉकडाऊनमुळे लोकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाहीये. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार अन्नधान्य, भाजीपाला, किराणामाल यासोबतच जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी काम शिक्षकांना लावण्यात आलं आहे. जर हे काम शिक्षकांनी केलं नाही किंवा कोणत्याही प्रकारची हलगर्जी केल्यास दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा शिक्षकांना देण्यात आला आहे.

यापूर्वी दिली होती कामं

या आधी बीडमधील शिक्षकांना रेशन दुकानासमोर बसून रेशनचा किती वाटप झाली आहे, याच्या नोंदी घेतल्या होत्या. तर अनेक शिक्षकांनी पोलिसांसोबत चेक पोस्टवर बाहेरगावावरून आलेल्या लोकांच्या नोंदी ठेवायचं काम केलं होतं. आता डिलीव्हरी बॉयचं काम दिल्यावर या निर्णयाच्या विरोधात मात्र मराठवाडा शिक्षक संघाच्या शिक्षकांनी तक्रार केली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – लॉकडाऊन उठल्यानंतर कोरोनाची मोठी लाट येऊ शकते; WHO चा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -