साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Mumbai
sahitya akadami purskar
साहित्य अकादमी पुरस्कार

ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्जनप्रेरणा आणि कवीत्वशोध यासाठी मधुकर पाटील यांना पुरस्कार दिला जाणार आहे. साहित्य अकादमीनं आज २४ भाषांमधील पुरस्कार जाहीर केले. सात कवितासंग्रह, सहा कादंबऱ्या, सहा लघुकथा, तीन साहित्य समीक्षा आणि दोन निबंधांची निवड साहित्य अकादमी पुरस्कारासाठी करण्यात आली.

उर्दू साहित्यासाठी कादंबरीकार रहमान अब्बास यांच्या ‘रोहजीन’ कांदबरीला पुरस्कार मिळाला तर हिंदी साहित्यासाठी चित्रा मुद्गल यांच्या ‘पोस्ट बॉक्स नं. २०३ – नाला सोपारा’ या कादंबरीची निवड झाली.

देशातल्या विविध २४ प्रादेशिक भाषांमधील साहित्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. यंदा सात कवितासंग्रह, सहा कादंबऱ्या, सहा लघुकथा, तीन समीक्षा आणि दोन निबंधांना हे पुरस्कार जाहीर झाले. प्रादेशिक भाषांमध्ये हिंदी, मराठी, उर्दू, असामी, बंगाली, बोडो, डोंगरी, इंग्रजी, गुजराती, कोंकणी, कन्नड, मैथिली, मल्याळम, नेपाळी, ओडिया, पंजाबी, राजस्थानी, संताली, सिंधी, तामिळ, तेलगु या भाषांमधील साहित्याचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here