‘है कौन राज ठाकरे?’ अबू आझमींची खोचक विचारणा!

Mumbai
samajwadi party leader abu azmi criticized on mns raj thackeray
'है कौन राज ठाकरे?' अबू आझमींची खोचक विचारणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी महाअधिवेशनात नमाजाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याच पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना खोचक विचारणा केली आहे. ते म्हणाले, ‘तुम्ही मीडिया राज ठाकरेंना इतकं का दाखवतात, कोण आहे राज ठाकरे? फक्त त्यांचा एकच आमदार आहे. त्यांचे सर्व आमदार आणि नगरसेवक संपले आहेत. यापूर्वी या थकलेल्या माणसाने भाजपाचा विरोध करून दंगा केला. यावेळी ना काँग्रेस ना राष्ट्रवादी काँग्रेसने, कोणीचं साथ दिली नाही. आता बिचारे एकटे पडले आहेत. तसंच त्यांना कोणत्या कोणत्या विधान करून त्यांना मीडियामध्ये चर्चेत राहण्याची त्यांची इच्छा असते.’

मनसे शिवसेनेची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे

‘जी स्वातंत्र्य अगोदरची परिस्थिती होती ती आता भारतात होत आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळे खांद्याला खांदे लावून चालतं आहेत. हे कितीही ओरडले तरी यांचा आवाज कुठेही पोहचू शकणार नाही. मला वाटतं नाही यांना राजकारणात जागा मिळेल. हे शिवसेनेच्या विरोधात राहून शिवसेनेची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु भाजप सोबत राहून शिवसेनेला दगा दिला होता. मात्र आता शिवसेना बरोबर जागेवर आहे. आता फक्त शिवसेना महाराष्ट्रापर्यंत मर्यादीत न राहता भारतात हा पक्ष वाढेल’, असं अबू आझमी म्हणाले.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

आमची आरती त्रास देत नाही, तर नमाज का त्रास देतोय? नमाज जरूर पढा. तो तुमच्या धर्माचा विषय आहे. पण भोंगे लावून का पढताय? बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोर किती येत आहेत, त्याचा कुणाला पत्ता लागत नाहीये. या घुसखोरांना हाकललं, तेव्हा कुणी का विचारलं नाही हिंदुत्वाकडे चाललात का? मला एकदा हिंदुत्व समजावून तरी सांगा.