घरमहाराष्ट्रराज्यसेवा पूर्व परीक्षा : केंद्र परिसरात १४४ कलम लागू

राज्यसेवा पूर्व परीक्षा : केंद्र परिसरात १४४ कलम लागू

Subscribe

२० उपकेंद्राच्या परिसरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित रहावी आणि अनाधिकृत कृत्ये होऊ नयेत, या दृष्टीकोनाने जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ नूसार बीड जिल्हा केंद्रावर १७ फेब्रुवारी २०१९ रोजी एकूण ५ हजार ८५६ उमेदवारांची परीक्षा घेण्याचे निश्चित झाले आहे. त्यानूसार २० उपकेंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसरात १४४ कलम जारी करण्यात आले आहे. २० उपकेंद्राच्या परिसरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित रहावी आणि अनाधिकृत कृत्ये होऊ नयेत या करीता बीडचे उपविभागीय दंडाधिकारी प्रभोदय मुळे यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे १९७३ चे कलम १४४ मधील शक्तीचा वापर करुन आदेशीत केले आहे की परीक्षेच्या दिवशी केंद्र परिसरात परीक्षा सुरु होण्याच्या एक तास अगोदरपासून ते परीक्षा संपेपर्यंत पेपर संपेपर्यंत १०० मीटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, परिक्षार्थी यांच्या व्यतिरीक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

…म्हणून जमावबंदी लागू

परीक्षेच्या वेळी परीक्षार्थी सोबत त्यांचे नातेवाईक, मित्र आणि हितचिंतक परीक्षा केंद्राच्या परीसरात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असे प्रसंग निर्माण झाल्यास केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना परीक्षा सुरळीतपणे पार पाडणे अडचणीचे होईल.

- Advertisement -

इंटरनेट सुविधाही बंद

परीक्षा केंद्रापासून १०० मीटर अंतराच्या परिसरात फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण आणि संदेश कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेससेट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, कॉम्प्युटर बाळगण्यास तसेच झेरॉक्स, एसटीडी मशीन चालु ठेवण्यास आणि ध्वनीक्षेपक वाजवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वेळेअभावी प्रत्ये इसमास नोटीस देणे शक्य नसल्यामुळे तसेच वेळेअभावी हा आदेश प्रत्येक इसमावर तामील करणे शक्य नसल्यामुळे फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये हा एकतर्फी आदेश देण्यात आला आहे, असे बीडचे उपविभागीय अधिकारी यांनी आदेशात नमुद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -