घरमहाराष्ट्रपुण्यात दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार

पुण्यात दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार

Subscribe

लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी सध्या फरार झाला असून त्याचा कोथरुड पोलीस शोध घेत आहेत.

सुसंस्कृत पुण्यामध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यामध्ये लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोथरुडमध्ये दोन चिमुरड्यांवर ६० वर्षाच्या नराधमाने बलात्कार केला आहे. कोथरुडच्या सुतारदऱ्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. साडेचार आणि साडेतीन वर्षाच्या चिमुकल्यांवर त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या आजोबांनी हे कृत्य केले आहे. मंगळवारी रात्री हा प्रकार उघड झाल्यानंतर आरोपीविरोधात कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घरात कोणी नसल्याचा घेतला फायदा

सुतारदऱ्यात राहणारे एक कुटुंबिय त्यांच्या दोन लहान मुलांना सोडून कामानिमित्त बाहेर गेले होते. दोन्ही लहान मुली घरी एकट्या असल्याचा फायदा घेत आरोपीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा सर्व प्रकार मुलींच्या आत्याच्या पाच वर्षाच्या मुलाने पाहिला. त्यानंतर संध्याकाळी आई घरी आल्यानंतर या मुलाने दोघींसोबत घडलेला सर्व प्रकार त्याच्या आईला सांगितला. हे ऐकूण धक्का बसलेल्या पीडित मुलीच्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठले.

- Advertisement -

फरार आरोपीचा शोध सुरु

याप्रकरणी पीडित मुलीच्या सांगण्यावरुन पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल करुन घेतली. त्याच्याविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आरोपीविरोधात तक्रार करण्यासाठी पीडित मुलींचे कुटुंबिय पोलीस ठाण्यात गेले असता आरोपी फरार झाला. कोथरुड पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -