घरमहाराष्ट्रमतदानाच्या जनजागृतीसाठी व्यापारीही पुढे सरसावले

मतदानाच्या जनजागृतीसाठी व्यापारीही पुढे सरसावले

Subscribe

लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी व्यापारी मतदाना संदर्भात जनजागृती करत आहेत. व्यापारी आपल्या बिलांवर ‘२९ एप्रिल रोजी मतदान करा' असा संदेश छापून मतदानाचे आवाहन करत आहेत.

मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून शासन आणि प्रशासनासोबत स्वयंसेवी संस्था आणि व्यापाऱ्यांनीही प्रयत्ना सुरू केले आहेत. एरवी ‘आज रोख कल उधार’च्या पलिकडे कोणत्याही सुविचाराचा वापर न करणाऱ्या दुकानदारांनीही ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलावर मतदान करण्याचा संदेश देण्यास सुरूवात केली आहे. यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोग, पालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था यांच्यावतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील व्यापाऱ्यांचेही सहकार्य घेतले जात आहे. दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मतदानाविषयी जागृत करण्यासाठी व्यापाऱ्यांनी बिलावरच ‘२९ एप्रिल रोजी मतदान करा’ असा संदेश छापून आवाहन केले आहे. सर्व स्तरातून होणाऱ्या या जागृतीचा नक्कीच परिणाम मतदारांवर होऊन यंदा मतदानाचा टक्का वाढेल, असा विश्वाास प्रशासनाच्या वतीने व्यक्त केला जात आहे.

व्यापाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

गेल्या लोकसभा निवडणुकीत जेमतेम ५० टक्के मतदान झाले होते. यंदा ही त्यात वाढ होऊन ठाणे जिल्ह्यात किमान ७० टक्के मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजातील सर्व घटकांना त्यात सहभागी करून घेतले जात आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे. याच प्रयत्नाांचा भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांशीही संपर्क साधला. त्याला काही व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे्.

- Advertisement -

व्यापारी अशाप्रकारे जनजागृती करत आहेत

ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आदी शहरातील औषध विक्रेते, सोन्याचे व्यापारी, धान्याचे व्यापारी यांच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचे आवाहन केले जात आहे. सोमवार २९ एप्रिल रोजी आवश्य करा, अशा स्वरुपाचा स्टॅम्पच व्यापाऱ्यांनी बिलावर मारुन ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील औषध विक्रेते बिलावर मतदान जनजागृतीचा स्टॅम्प मारून निवडणुकीत लोकांचा सहभाग वाढण्यासाठी प्रयत्ना करीत असल्याची माहिती ठाणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी दिली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -